रेमडेसिविरचा तीन दिवसांपासून पुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:36 AM2021-04-16T04:36:00+5:302021-04-16T04:36:00+5:30
बॉक्स परिणय फुके यांची आरोग्यमंत्र्यांशी चर्चा भंडारा व गोंदिया जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांची पायपीठ होत आहे. शासकीय ...
बॉक्स
परिणय फुके यांची आरोग्यमंत्र्यांशी चर्चा
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांची पायपीठ होत आहे. शासकीय पातळीवर पुरेशा सुविधा मिळत नाही. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक होत आहे. अशा परिस्थितीत आ. परिणय फुके यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली. तात्काळ पुरेशा प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा करण्याची मागणी केली. तसेच रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा करणाऱ्या हेट्रो कंपनीच्या नागपूर येथील गोदामाला अचानक भेट दिली. इंजेक्शनची असलेली उपलब्धता व प्रत्येक जिल्ह्यात इंजेक्शनची मागणी यावर अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा केली. शासन निर्णय १३ एप्रिलच्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्याला दोन टक्के इंजेक्शनची पूर्तता होत आहे. हा पुरवठा रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या अनुषंगाने कमी आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि हेट्रो कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. लवकरच पुरेशा प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध करून देत असल्याचे आश्वासन आ. फुके यांना देण्यात आले.