अतिक्रमण काढून त्याच जागेवर केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:37 AM2021-08-26T04:37:28+5:302021-08-26T04:37:28+5:30

२५ लोक ०७ के अडयाळ : अडयाळ ...

Removal of encroachment and planting in the same place | अतिक्रमण काढून त्याच जागेवर केले वृक्षारोपण

अतिक्रमण काढून त्याच जागेवर केले वृक्षारोपण

Next

२५ लोक ०७ के

अडयाळ : अडयाळ वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या केसलवाडा बिटातील कक्ष क्रमांक २०९ संरक्षित केसलापुरी गट क्रमांक ६९ मधील ०.८१ हे.आर जागेवरील अतिक्रमण काढण्यात आला. लगेच त्याच जागेवर वृक्षारोपण करून जागेवर मार्किंग सुद्धा करण्यात आली. ही कारवाई अडयाळ वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद पंचभाई, बीट रक्षक केसलवाडा, अडयाळ, तिर्री, जे. डी. हटवार, सोनू निंबार्ते, आकाश कवाडे तथा वनमजूर यांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास धडक कारवाई करून अतिक्रमण काढून त्याठिकाणी वृक्षारोपण केले. माहितीनुसार ज्या ग्रामस्थांनी अतिक्रमण केले होते. त्याला एक जमिनीचा पट्टा मिळाला आहे.

पण ज्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. तो भूभाग मात्र आजही वन विभागाच्या नोंद वहीत आहे. एकंदरीत जी जमीन देण्यात आली ती दुसरीकडे आहे. त्याचमुळे मोठा घोळ झाला असल्याचे बोलले जात आहे. अतिक्रमण काढताना संबंधिताने कुठल्याही प्रकारचा त्रास वनविभाग अधिकारी तथा कर्मचारी यांना दिला नसल्यानेही कारवाई तडकाफडकी झाली असल्याचेही बोलले जात आहे.

अडयाळ वनपरिक्षेत्र हद्दीतील जागेवर अजूनही बरेच अतिक्रमण असल्याची चर्चा आहे.

Web Title: Removal of encroachment and planting in the same place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.