बगीच्यामधील अतिक्रमण हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 09:53 PM2017-12-22T21:53:28+5:302017-12-22T21:54:35+5:30

शासकीय जमीन बगीच्यासाठी हस्तांतरीत केल्यानंतरही त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे.

Remove encroachment in the garden | बगीच्यामधील अतिक्रमण हटवा

बगीच्यामधील अतिक्रमण हटवा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आदेशानंतरही कारवाईसाठी उदासीनता

आॅनलाईन लोकमत
भंडारा : शासकीय जमीन बगीच्यासाठी हस्तांतरीत केल्यानंतरही त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. सदर अतिक्रमण काढून जागा मोकळी करावी व बगीचा निर्माण करावा, अशी मागणी वासुदेव भुरे व दिलीप पडोळे यांनी केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे यापुर्वीही जिल्हा दंडाधिकाऱ्यांनीही या जागेची पाहणी करून नगरपरिषद पदाधिकाºयांसह प्रशासनाला सदर अतिक्रमण काढण्याचे व समस्या सोडविण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या आदेशाकडे सपेशल दुर्लक्ष करण्यात आले आहे.
मौजा भंडारा नझूल शिट नं. ४ येथील गट नं. १/२ मधील ३८०० चौ.मी. ही सरकारी जागा १४ सप्टेंबर २००१ रोजी सार्वजनिक बगीच्यासाठी न.प. भंडाराकडे हस्तांतरीत करण्यात आली होती. यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. ही जागा शुक्रवारी पेठ येथे आहे. विद्यमान मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिले असले तरी कारवाई झालेली नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी स्वत: मौका पाहणी करून अतिक्रमण हटवून बगीचा तयार करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Remove encroachment in the garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.