‘त्या’ शिक्षकांवरील अन्याय दूर करा

By admin | Published: June 18, 2016 12:28 AM2016-06-18T00:28:03+5:302016-06-18T00:28:03+5:30

आपलीच माणसं आपणास दगा देतात, आपल्याला संकटात ढकलतात आणि कुऱ्हाडीच्या दांड्याप्रमाणे आपल्याच प्रजातीला धोका निर्माण करतात,

Remove those injustice from teachers | ‘त्या’ शिक्षकांवरील अन्याय दूर करा

‘त्या’ शिक्षकांवरील अन्याय दूर करा

Next

मासळ : आपलीच माणसं आपणास दगा देतात, आपल्याला संकटात ढकलतात आणि कुऱ्हाडीच्या दांड्याप्रमाणे आपल्याच प्रजातीला धोका निर्माण करतात, असाच काहीसा प्रकार शिक्षक बदली प्रकरणात सध्या अनुभवास येत आहे.
मुठभर शिक्षकावर तथाकचित झालेल्या अन्यायाविरूद्ध काही शिक्षक संघटनांनी शासनापर्यंत तक्रार दाखल केल्या व त्याचे पर्यवसान बदलीस स्थगिती असा झाला. शिक्षक संघटना नेहमीच शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरूद्ध लढत असतात. परंतु त्यावर किंचितही विचार न करता आंदोलने, उपोषणे करून टोकाची भूमिका घेत असतात.
त्याचा विपरीत परिणाम काय होईल, याचा विचारही करित नाही. बदली झालेले बहुसंख्य शिक्षक आनंदी आहेत. दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षे एकाच ठिकाणी नक्षलग्रस्त भागात ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे शिक्षक यावर्षी मात्र चांगले दिवस आले म्हणून खुष असतानाच, मुठभर शिक्षकांची बाजु घेणाऱ्या शिक्षक संघटनांना बहुसंख्येने आदिवासी नक्षल प्रभावित भागात काम करणाऱ्या आपल्याच शिक्षक बांधवांचा विसर पडला. स्वमर्जीतील शिक्षक सहकार्यांचे अडचणी, प्रश्न तक्रारकर्त्यांना मोठे वाटले परंतु त्याचबरोबर वर्षानुवर्षापासून जे सहकारी शिक्षक आपल्या आई-वडिलांचे आजारपण, पत्नीचे पतीचे आजारपण, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, कौटुंबिक गरजांसाठी आजपर्यंत स्व तालुक्यात किंवा बगर नक्षलग्रस्त तालुक्यात येण्यासाठी धडपडत होते, त्यांचा या तथाकचित संघटनांनी किंचितही विचार केला नाही आणि आमचा विजय झाला, आम्ही जिंकलो या अविर्भावात बदल्यांना स्थगिती मिळविली.
संघटनात्मक कामासाठी शिक्षकांनी संघटनेला वेळोवेळी बळ दिले. आता मात्र त्यांच्या आनंद यांच्या डोळ्यात सलायला लागला हे कितपत योग्य आहे, ही बाब समजून घ्यायला अन्य विसरलेत. (वार्ताहर)

Web Title: Remove those injustice from teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.