गोसे पुनर्वसन कार्यालय पुन्हा भंडारात सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:41 AM2021-03-01T04:41:33+5:302021-03-01T04:41:33+5:30
भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी निवेदन देण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पात भंडारा व पवनी तालुक्यातील ...
भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी निवेदन देण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पात भंडारा व पवनी तालुक्यातील २५ हजार एकर शेती पाण्याखाली गेली आहे. १०४ गावे धरणग्रस्त आहे. पुनर्वसनासह अनेक प्रश्न प्रलंबित आहे. असे असताना गत सरकारने गोसेखुर्द उपविभागीय कार्यालय नागपूर येथे हलविण्यात आले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. समस्यांचे निराकरण करण्यास अडचणीचे जात आहे. त्यामुळे भंडारा येथे पुन्हा गोसे पुनर्वसन कार्यालय सुरू करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यासोबतच पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी आढावा बैठकीतही सोनकुसरे यांनी प्रश्न उपस्थित केले. पिंडकेपारटोली भूसंपादन प्रक्रिया तत्काळ करून टोलीवर घराचा मोबदला द्यावा, बेला येथे नवीन गावठाण येथे प्लॉट देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या समस्यांचे तत्काळ निराकरण करून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.