पावसाळ्यापूर्वी कवेलू घरांच्या दुरुस्तीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:33 AM2021-05-17T04:33:43+5:302021-05-17T04:33:43+5:30
माकडांच्या धुमाकुळाने कच्च्या घरांचे नुकसान होत आहे. गावखेड्यात माकडांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत आहे. गावात असलेल्या फळांच्या झाडांवर त्यांचा उदरनिर्वाह ...
माकडांच्या धुमाकुळाने कच्च्या घरांचे नुकसान होत आहे. गावखेड्यात माकडांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत आहे. गावात असलेल्या फळांच्या झाडांवर त्यांचा उदरनिर्वाह आल्याने माकड वस्ती सोडायला तयार नाहीत. एका घरावरून दुसर्या घरावर माकडांच्या उड्यांमुळे कच्च्या घरांचे नुकसान होत आहे. याकरिता ग्रामपंचायत स्तरावरून ठोस उपाययोजनांची गरज गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता कच्च्या घरांच्या साहित्याला अपेक्षित मागणी राहिलेली नाही. साध्या कवेलूसुद्धा विकत नाही. लागलेली लागत सुद्धा निघत नाही. त्यामुळे आता कच्च्या घडांचे साहित्य विकणे बंद झालेले आहे. पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात माझ्या दुकानातून कवेलूची विक्री होत होती. परंतु काळानुरूप खूप बदल झाला असून, सिमेंटचे घर बांधण्याकडे कल वाढलेला असल्याचे पालांदूर येथील मानसी ट्रेडर्सचे संचालक नीलकंठ खंडाईत यांनी सांगितले.