त्या आक्षेपार्ह लिखाणाबद्दल तात्काळ गुन्हा नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:16+5:302021-01-24T04:17:16+5:30
भालचंद्र नेमाडे लिखित ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत लमाण (बंजारा) समाजातील स्त्रियांबद्दल जाणीवपूर्वक आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामुळे ...
भालचंद्र नेमाडे लिखित ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत लमाण (बंजारा) समाजातील स्त्रियांबद्दल जाणीवपूर्वक आक्षेपार्ह लिखाण केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशपातळीवरील बंजारी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. २०१४ सालचा साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार या कादंबरीला मिळाला आहे. हा पुरस्कार शासनाने तत्काळ परत घेण्याची मागणीही बंजारा समाज कर्मचारी संघाने केली आहे. तत्काळ कादंबरीच्या विक्रीवर निर्बंध आणण्याची मागणी भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी दिनेश राठोड, सचिव कुणाल जाधव, कार्याध्यक्ष विजय जाधव, कोषाध्यक्ष सुशील चव्हाण, प्रकाश राठोड, कोमल राठोड, हरिश्चंद्र चव्हाण, शंकर राठोड, दिगांबर राठोड, सुंदरसिंग राठोड, उत्तम राठोड, गोपाल राठोड, दिलीप पवार, संजय जाधव, प्रदीप पवार यांनी केली आहे.
बॉक्स
दिलेला पुरस्कार परत घ्या
मराठी साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा दिला जाणारा २०१४ चा ज्ञानपीठ पुरस्कार ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीला दिला. हा ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणीही बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. स्त्रियांना दुय्यम दर्जा देऊन स्त्रियांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या लेखकावर शासनाने तत्काळ गुन्हा नोंदवून समाजात चांगला संदेश देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.