ग्रामसेवक संघाच्या शिष्टमंडळाचे ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 10:18 PM2017-12-28T22:18:45+5:302017-12-28T22:18:55+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ राज्य कार्यकारिणीच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व दादासाहेब भुसे यांना ग्रामसेवकाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा केली तसेच निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ राज्य कार्यकारिणीच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व दादासाहेब भुसे यांना ग्रामसेवकाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा केली तसेच निवेदन दिले.
या निवेदनानुसार, तीन वर्ष कंत्राटी कालावधी सलग सेवेत समाविष्ट करणे, ग्रामसेवक संवर्गावर इतर कोणत्याही विभागाचे काम काढण्यात येऊ नये, याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, डीसीपीएस मासिक कपात विवरण नियमित मिळावे, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी व १ मे या सणाचे व सुट्टीचे दिवशी ग्रामसभा घेऊ नये किंवा तारखेत बदल करावे व इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ राज्य कार्यकारिणी सोबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. ‘पंतप्रधान हर घर सहज बिजली योजना’ कामावर ग्रामसेवक संघाने टाकलेला बहिष्कार मागे घ्यावा, अशी विनंती मंत्र्यांनी केल्यामुळे सदर योजनेचे काम करण्यास राज्यातील ग्रामसेवक संघाने सहकार्य करावे, असे ठरले. यावेळी महाराष्ट्र ग्रामसेवक संघाचे नागपूर विभागीय अध्यक्ष विलास मुंडे, नागपूरचे जिल्हाध्यक्ष भारत मेश्राम, सचिव पुनम पांडे, रवी रेहपाडे, हरिदास रानडे, भंडाराचे जिल्हाध्यक्ष माकडे, सचिव सुधाकर चिंधालोरे उपस्थित होते. सदर निवेदन देतानी तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी सहकार्य केले.