अड्याळ येथे गणराज्य दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:42 AM2021-02-05T08:42:33+5:302021-02-05T08:42:33+5:30

अड्याळ : गणराज्य दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सर्पमित्र फ्रेंड्स ग्रुप, जय बजरंग कबड्डी क्रीडा मंडळ, अड्याळ लाइव्ह ग्रुप, वायसीसी, ...

Republic Day Marathon at Adyal | अड्याळ येथे गणराज्य दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

अड्याळ येथे गणराज्य दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

Next

अड्याळ : गणराज्य दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सर्पमित्र फ्रेंड्स ग्रुप, जय बजरंग कबड्डी क्रीडा मंडळ, अड्याळ लाइव्ह ग्रुप, वायसीसी, बीसीसी, तसेच संरक्षण टीम अड्याळ तसेच समस्त ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार ग्राउंड अड्याळ येथे करण्यात आले होते. यामध्ये मुलं-मुलींकरिता ओपन गट, तर विद्यार्थ्यांकरिता तसेच वयस्क यांच्याकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या धावपट्टी अंतर ठेवून स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. या गटात एकूण यावर्षी तब्बल २५० स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. त्यात आयोजकांनी अटी-शर्ती व नियमानुसार ही स्पर्धा घेतली. त्यात प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या एकूण १४ स्पर्धकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार व रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात आली. स्पर्धेची सुरुवात बाजार ग्राउंड येथील पटांगणावर संपूर्ण स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांनी गणराज्य दिनाच्या शुभेच्छा देत व फीत कापून करण्यात आली यावेळी मधू गभने, सभापती पंचायत समिती पवनी शिवशंकर मुंगाटे माजी उपसभापती पंचायत समिती पवनी, सरपंच जयश्री कुंभलकर, सदस्य व कर्मचारी, तसेच सुशांत पाटील ठाणेदार अड्याळ, कृष्णा साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक अडयाळ, मोहन घोगरे, माजी सरपंच कलेवाडा, माजी उपसरपंच देवीदास नगरे, ईश्वर खंडाईत, शिक्षक वीरेंद्र तितरमारे, अमोल उराडे, हिरा तिवाडे, अमोल करंजेकर, भूषण निखारे, राधेश्याम लोणारे, महेश कुंभलकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.

सत्कार झालेल्यामध्ये लीलाराम बावणे, विकेश शेंडे खरबी, साहिल पवनकर खमारी, नरेंद्र बालकणे दिघोरी, गीता चाचरकर वेलतूर, सपना वेळदा भंडारा, दुर्गा देशमुख मुरमाडी, सविता बालकणे दिघोरी, वेदिका जावळे पवणी, दीप्ती भोयर कोल्हारा, उर्वशी निंबार्ते मुरमाडी, उज्ज्वल रेहपाडे पहेला, प्रज्वल कडवं कमकाझरी, श्रेयश उईके अडयाळ या स्पर्धकांचा तसेच प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा व संरक्षण टीमचा सुद्धा सत्कार यावेळी करण्यात आला. स्पर्धेसाठी अड्याळ ग्रामवासीयांनी संदीप शेंडे, दिनेश पाठक, गुणवंत खंडाईत ,कमलेश जाधव इत्यादी ग्रामस्थांनी सहाकार्य होते.

Web Title: Republic Day Marathon at Adyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.