वैद्यकीय संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By admin | Published: December 25, 2015 01:44 AM2015-12-25T01:44:00+5:302015-12-25T01:44:00+5:30
बीव्हीजी इंडिया लिमिटेड द्वारे संचालित १०८ इमरजन्सी मेडीकल सर्व्हीसद्वारे डॉक्टरांना निकृष्ठ दर्जाची वागणुक मिळत असून....
अधिकाऱ्यांशी चर्चा : समस्या तात्काळ निकाली काढण्याची केली मागणी
साकोली : बीव्हीजी इंडिया लिमिटेड द्वारे संचालित १०८ इमरजन्सी मेडीकल सर्व्हीसद्वारे डॉक्टरांना निकृष्ठ दर्जाची वागणुक मिळत असून अत्यंत कमी वेतनात अत्यंत संवेदनशील आपातकालीन वैद्यकिय सेवा राबवून घेतात या समस्या तात्काळ सोडविण्यात यावे असे निवेदन आपातकालीन वैद्यकिय अधिकारी असोसिएशन भंडारा तर्फे नुकतेच मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
या निवेदनाप्रमाणे शासनाने मार्च २०१४ पासून ही योजना संपुर्ण महाराष्ट्रात जनसामान्यासाठी सुरु केली आहे. अर्थातच ही योजना रुग्णासाठी एकप्रकारे संजीवनीच ठरली आहे.
शासनाने ही योजना ठेकेदारी पध्दतीने बीव्हीजी इंडिया लि. पुणे या कंपनीला दिला आहे. यामध्ये १०८ इंडिया लिमिटेड पुणे अॅम्बुलन्स डॉक्टर(ईएमएसओ) व पायलट असा संपुर्ण संच काम करतो. यामध्ये महत्वाचा स्तंभ डॉक्टर आहे. ज्याच्याद्वारे रुग्णांना जिवदान मिळते पंरतु ह्याच डॉक्टरांना अत्यल्प वेतनात फक्त १० हजार रुपये रोजंदारी तत्वावर सुरु केली आहे. हा डॉक्टरांच्या अपमान आहे. व सेवा मात्र पुर्णपणे घेतात व त्यांना एक कर्मचारी म्हणुन दर्जा देण्यात येत नाही.
त्यामुळे शासनाने डॉक्टरांना स्थाई म्हणून कार्यरत करावे व रोजंदारी पध्दती रद्द करावी. मासिक वेतन ३० ते ३२ हजार एवढे करण्यात यावे. व्यवसाय कर व भविष्य निर्वाह निधी कपात करुन पावती देण्यात यावी, डॉक्टर व पायलट यांचा विमा ४ लक्ष रुपयाचा काढण्यात यावा, शहरी व ग्रामीण डॉक्टरांचे वेतन समान असावे.
भंडारा व गोंदिया हे जिल्हे नियमाप्रमाणे सोयीसुविधा देण्यात यावी, गाडी आॅफ रोड असतांना पगार कापण्यात येऊ नये, वर्षाच्या १२ सुट्या देण्यात याव्यात. यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)