आरोग्य केंद्र बांधकामासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

By admin | Published: August 26, 2016 12:38 AM2016-08-26T00:38:01+5:302016-08-26T00:38:01+5:30

तालुक्यातील केसलवाडा वाघ प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठी शासनाने जागा आणि निधी उपलब्ध केला असला

Request to Guardian Minister for Construction of Health Centers | आरोग्य केंद्र बांधकामासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

आरोग्य केंद्र बांधकामासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

Next

लाखनी : तालुक्यातील केसलवाडा वाघ प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठी शासनाने जागा आणि निधी उपलब्ध केला असला तरी जि.प. पदाधिकाऱ्याच्या दबावापोटी आरोग्य व बांधकाम विभागातील अधिकारी यांचेकडून वेळकाढू धोरणाचा अवलंब करण्यात येत असल्याने मागील एक वर्षापासून इमारत बांधकाम रखडले आहे. तात्काळ बांधकाम सुरू करावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते दिनेश वासनिक यांनी दिपक सावंत आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री भंडारा यांना निवेदन दिले आहे.
लाखनी येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा वाघ येथे २००५ साली स्थानांतरीत करण्यात आले. त्यात लाखनी, मुरमाडी सावरी, गराडा, केसलवाडा, धारगाव, किन्ही, सोनेखारी आदी गावांचा समावेश आहे. इमारती अभावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज जि.प. प्राथमिक शाळेच्या खोल्यामधून चालविले जाते. ग्रामपंचायत कडून प्राथमिक आरोग्य केंद्रास गावाजवळील जलकुंभाजवळील सरकारी जागा देण्याचा ठराव पारीत करून संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला. २७ जुलै २०१५ रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांनी सरकारी जागा गट क्रमांक ६१९ आराजी ०.९३ हेक्टर आर जागेचा बांधकामासाठी आगावू ताबा दिल्याचे निवेदनात नमुद आहे.
प्रस्तावित बांधकामासाठी ४ कोटी ९५ लाख रूपये पैकी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १ कोटी रूपये शासनाने जिल्हा परिषद भंडाराचे बॅक खात्यात जमा केल्याचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश वासनिक यांचे म्हणने आहे. सदर निधी मार्च २०१६ पर्यंत खर्च करण्याचे शासनाचे निर्देश असताना माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व बांधकाम सभापती यांचे दबावामुळे मागील एक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम रखडलेला आहे. रखडलेले बांधकामाचे लवकरात लवकर भूमिपूजन करून काम सुरू करावे व दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी याकरिता स्वातंत्र्यदिनी सामाजिक कार्यकर्ता दिनेश वासनिक, रवि कानेकर, ईश्वर नागलवाडे, रमेश हलमारे, उमेश शेंडे, रविकांत सरोदे यांनी भंडारा येथे जावून पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना निवेदन दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Request to Guardian Minister for Construction of Health Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.