बावनथडी धरणाचा जलसाठा वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:07 AM2019-08-30T01:07:20+5:302019-08-30T01:07:43+5:30
तुमसर-मोहाडी तालुक्याकरिता वरदान ठरलेला बावनथडी धरणात पाणी साठ्यात वाढ होत असून चार टक्के पाणीसाठा वाढल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. बावनथडी प्रकल्प आंतरराज्यीय असून मध्यप्रदेशातील वाराशिवनी व बालाघाट येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बावनथडी धरणात बुधवारपर्यंत केवळ चार टक्के जिवंत पाणी साठ्याची साठवणूक झाली. मृत साठ्यातून जिवंत पाणी साठ्याकडे वाटचाल सुरु झाली. मध्यप्रदेशात पाऊस बरसल्याने धरणात पाणी साठा वाढणे सुरु आहे. सिंचनाकरिता किमान धरण साठ टक्के भरण्याची तांत्रिकदृष्ट्या गरज आहे.
तुमसर-मोहाडी तालुक्याकरिता वरदान ठरलेला बावनथडी धरणात पाणी साठ्यात वाढ होत असून चार टक्के पाणीसाठा वाढल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. बावनथडी प्रकल्प आंतरराज्यीय असून मध्यप्रदेशातील वाराशिवनी व बालाघाट येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. तुमसर, मोहाडी तालुक्यातील सुमारे १७ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय सदर धरणामुळे होते. सुमारे १२ हजार ५०० कोटींचा खर्च या प्रकल्पावर दोन्ही राज्याचे खर्च केला आहे. पावसाची सरासरी कमी असल्याने धरणात मृतसाठा शिल्लक होता. सिंचनाकरिता किमान साठ टक्के धरण भरणे आवश्यक आहे. विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.
पाणीटंचाईची शक्यता
धरण भरल्यानंतर सिंचनाची सुविधा होते. परंतु यावर्षी धरण भरण्यासंदर्भात शंका उपस्थित होत आहे. बावनथडी धरणात जिवंत पाणीसाठा उपलब्ध झाल्यावर विहिरींची पाणी पातळीत वाढ होते. पाणी पातळीत वाढ न झाल्यास पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
पिकाला धोका
बावनथडी प्रकल्पातून शेतीकरिता पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. धरण न आल्यास सिंचनाकरिता पाणी सोडले जाणार नाही. त्यामुळे पिकांना मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या धरण भरण्याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
बावनथडी धरणाची वाटचाल जिवंत साठ्याकडे सुरु झाली आहे. बुधवारपर्यंत जिवंत पाणी साठा चार टक्के झाला आहे, धरणास किमान ६० ते ६५ टक्के पाणी साठा उपलब्ध झाला तर सिंचनाकरिता पाण्याचा विसर्ग करता येतो.
-आर.आर. बडोले, उपविभागीय अभियंता, बावनथडी प्रकल्प, तुमसर