प्रकल्पग्रस्तांचे धरणावर निवासी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:32 AM2018-02-19T01:32:21+5:302018-02-19T01:32:35+5:30

राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पासाठी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र प्रकल्प बाधीतांना प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने आजही अनेक कुटुंब मोबदल्यापासून वंचित आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पबाधीत आता आंदोलनाच्या तयारी आहेत.

 Resident movement on Project Dharon dam | प्रकल्पग्रस्तांचे धरणावर निवासी आंदोलन

प्रकल्पग्रस्तांचे धरणावर निवासी आंदोलन

Next
ठळक मुद्देपत्रपरिषदेत माहिती : पुनर्वसन रखडले, न्यायासाठी प्रकल्पबाधित कुटुंबाचा एल्गार

ऑनलाईन लोकमत
भंडारा : राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पासाठी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र प्रकल्प बाधीतांना प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने आजही अनेक कुटुंब मोबदल्यापासून वंचित आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पबाधीत आता आंदोलनाच्या तयारी आहेत. सर्व प्रकल्पबाधीत यासाठी निवासी जनआंदोलन करणार असल्याची माहिती शनिवारला प्रकल्पग्रस्तांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रहारचे जिल्हाध्यक्ष राजेश पाकमोडे, एजाज अली, भंडारा तालुका प्रमुख मंगेश वंजारी, रवि मने, चारूल रामटेके, सुनिल कहालकर यांनी पत्रकार परिषदेत जिल्हा प्रशासनाला निर्वानिचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी सदर आंदोलन २१ फेब्रुवारीला मेंढा पुनर्वसन ते राजीव टेकडीदरम्यान पटाचे बरड येथे होत असल्याचे सांगितले. आंदोलनादरम्यान रक्तदान करून 'रक्त घ्या परंतु न्याय द्या' अशी मागणी करणारे अभिनव रक्तदान शिबिर यावेळी करण्यात येणार आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार असून न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली. गोसीखुर्द प्रकल्पात ८५ गावे व १८२ शेतशिवार बाधित झाले आहेत.
या प्रकल्पाला ३० वर्षांचा कालावधी लोटला असून सरकार यावर कोट्यवधींचा खर्च करीत असताना प्रकल्पबाधीतांना मात्र वाºयावर सोडल्याचा आरोप पत्रपरिषदेतून प्रकल्पबाधीतांनी केला आहे. पत्रपरिषदेला यशवंत टिचकुले, मारोती हारगुडे, रूपेश आतीलकर, देवा रामटेके, सुनिल हटवार, महेश दिवटे, अनिल दुधकवर, गुलाब सेलोकर, वाल्मिक नागपुरे, श्रावण उके आदी उपस्थित होते.

Web Title:  Resident movement on Project Dharon dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.