राजीनामा स्वत:च्या स्वार्थासाठी की जनतेच्या हितासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:16 PM2018-05-20T22:16:03+5:302018-05-20T22:16:19+5:30

२००९ मध्ये आमदारपदाचा राजीनामा देऊन माजी खासदाराने लोकसभेची निवडणूक अपक्ष लढविली. त्यावेळी अपयश आले. त्यामुळे भाजपात प्रवेश केला. भाजपातून निवडून आल्यामुळे खासदार झाले. आता पुन्हा खासदारपदाचा राजीनामा दिला.

Resignation for self-interest or for the benefit of the people? | राजीनामा स्वत:च्या स्वार्थासाठी की जनतेच्या हितासाठी?

राजीनामा स्वत:च्या स्वार्थासाठी की जनतेच्या हितासाठी?

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : साकोलीत भाजपची प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : २००९ मध्ये आमदारपदाचा राजीनामा देऊन माजी खासदाराने लोकसभेची निवडणूक अपक्ष लढविली. त्यावेळी अपयश आले. त्यामुळे भाजपात प्रवेश केला. भाजपातून निवडून आल्यामुळे खासदार झाले. आता पुन्हा खासदारपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी काँग्रेस पक्ष खराब होता तर आता तोच पक्ष पुन्हा चांगला कसा झाला. माजी खासदाराचा राजीनामा हा स्वत:च्या स्वार्थासाठी की जनतेच्या हितासाठी हे आपण आता ठरविले पाहिजे. या पोटनिवडणुकीत राजीनामा नाट्याला पूर्णविराम द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
साकोली येथील होमगार्ड परेड ग्राऊंडवर भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत बोलत होते. यावेळी ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, उमेदवार हेमंत पटले, आ. बाळा काशीवार, आ.संजय पुराम, नगराध्यक्ष धनवंता राऊत, सभापती उषा डोंगरवार, जि.प.सदस्य डॉ.नेपाल रंगारी, आ.अनिल सोले, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, दादा टिचकुले, माजी सभापती गीता कापगते, तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, साकोली तालुक्यातील ‘भेल’ प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. भीमलकसा प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. भाजप हा पक्ष सर्वसामान्य जनतेच्या हिताचा येथे लोकहिताची कामे केली जातात.
कधी नव्हे तेवढा निधी भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात आला आहे. यापुढेही दोन्ही जिल्ह्याच्या विकासाकरिता निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगितले. सभेचे संचालन भोजराम कापगते यांनी तर आभारप्रदर्शन माजी सभापती गीता कापगते यांनी केले.

Web Title: Resignation for self-interest or for the benefit of the people?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.