तुमसर हागणदारीमुक्तीचा संकल्प

By admin | Published: March 16, 2016 08:34 AM2016-03-16T08:34:25+5:302016-03-16T08:34:25+5:30

तुमसर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असताना स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे टाकत मुख्याधिकारीसह नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांनी ...

The resolution of the humiliation | तुमसर हागणदारीमुक्तीचा संकल्प

तुमसर हागणदारीमुक्तीचा संकल्प

Next

विशेष आमसभेत ठराव पारित : दोन महिन्यात हागणदारीमुक्त करण्याकरिता मास्टर प्लान
तुमसर : तुमसर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असताना स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे टाकत मुख्याधिकारीसह नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांनी शहराला हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला व विशेष आमसभेचे आयोजन करून सर्वानुमते तो पारित केला आहे. विशेष म्हणजे सभेत मास्टर प्लान तयार करून दोन महिन्यात शहर हागणदारीमुक्त करण्यावर भर दिला जाईल.
तुमसर शहराबाहेर रस्त्यावरील बोरी रोड, कोष्टी रोड, सिहोरा रोड, कटंगी बायपास रोड, देव्हाडी रोड, हनुमानताल रोड, हनुमान तलाव, गांधी सागर तलाव, पिपरा रोड, शिव मंदिर रोड, शिवाजी नगर, येरली रोड वर नागरिक उघड्यावर रस्त्याच्या कडेला शौचास बसत असल्याने शहराबाहेरील घाण शहरात येते. शहर अस्वच्छ होत असल्यामुळे १४ व्या वित्त आयोग तसेच पालिका फंडातून खर्चाची तरतूद करीत मास्टर प्लान द्वारे शहर हागणदारीमुक्त करणार आहेत. त्यात शहरात असलेले सर्व सार्वजनिक शौचालयाची रंगरंगोटी करणे, संपूर्ण शिट लावणे, दारे लावणे, पाणी टंकी लावणे व तिथे इलेक्ट्रीक फिटींग करणे आदी कार्य करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे वैयक्तिक शौचालय अंतर्गत लाभार्थ्यांना १३,००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. वैयक्तिक शौचालयाकरिता आतापर्यंत १०३५ लाभार्थ्यांचे अर्ज पालिकेला प्राप्त झाले असून ९८० अर्ज शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केले असून ७८० अर्जांना मान्यता मिळाली आहे व लाभार्थ्यांना ६००० रुपयांचा पहिला हप्ताही देण्यात आला आहे.
नागरिकांत जनजागृतीकरिता कलापथक जाहिराती, बॅनर, होर्डींग, हँडबिल, पॉम्प्लेट आदींचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या निकषात न बसणारे व शौचालयाची गरज असणाऱ्या नागरिकांना पाच सदस्यीय समितीने पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांनाही विशेष बाब म्हणून १३ हजार रुपये शौचालय बांधकामाकरिता देण्यात येणार आहे.
दरम्यान एका एजंसीची नेमणूक करून शहरातील लोकांकडे शौचालय आहे किंवा नाही ते तपासून त्यांना शौचालय असल्याचे प्रमाणपत्र देणार आहे. दोन महिन्यानंतर शौचालय असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कोणतेही दाखले देण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रत्येकाला शौचालय बांधावेच लागणार असल्याचे मास्टर प्लान तयार करण्यात आले आहे. आजच्या विशेष सभेत नगरसेवकासह विविध संघटनेचे पदाधिकारी, महिला बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव, शहरातील गणमान्य नागरिकांना उपस्थित राहण्यासंबंधात निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे सभेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सभेचे प्रास्ताविक नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी तर आभारप्रदर्शन मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The resolution of the humiliation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.