आरक्षणाने मिळाला महिलेला सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:55 PM2017-11-13T22:55:35+5:302017-11-13T22:55:51+5:30
प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाने यशाची उंच शिखर गाठत आहेत. आरक्षणाने राजकारणात मोठ्या प्रमाणात महिला समोर येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाने यशाची उंच शिखर गाठत आहेत. आरक्षणाने राजकारणात मोठ्या प्रमाणात महिला समोर येत आहेत. तथापि, मोहगाव देवी येथे गावच्या राजकारणी धुरा सांभाळण्याचा सन्मान तब्बल ६८ वर्षानंतर महिलाच्या हाती आली आहे. असा ऐतिहासिक सन्मान सत्यफुला लेंडे यांना प्राप्त झाला आहे.
पुरूष संस्कृतीच्या फेºयात महिलांचा घर अन् मुल याच वर्तृळात राहावे लागत होते. घराबाहेरचे विश्व महिलांना बघता येत नव्हते, तशी पुरूष संस्कृती मान्यताही देत नव्हती. गावखेड्यात तर पुरूष संस्कृतीने महिला बंदिस्तच होत्या. अलिकडच्या काळात मुली शिकायला बाहेर जावू लागल्या. उच्च शिक्षण घेवू लागल्या. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करू लागल्या. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला तालुक्याला जावू लागल्या, लहान उद्योग करीतच त्या महिलांना राजकारण येण्यासाठी आरक्षणाचे बळ मिळाले.
त्या मोहगावदेवीच्या विसाव्या तर पहिल्या महिला सरपंच बनण्याचा मान त्यांना मिळाला आहे. मोहगाव देवी येथील ग्रामपंचायतची स्थापना ५ आॅक्टोबर १९४९ रोजी झाली. त्या गावचे पहिले सरपंच तुळशिराम लांबट, गोपाळराव लांबट, पुन्हा तुळशिराम लांबट, बिजाराम लेंडे, रामकृष्ण खडके, मारोती बालपांडे, महादेव लेंडे, चांगो साखरवाडे, कुंडलिक लेंडे, अनिल काळे, दिनकर लांबट, कुडलिक लोंडे, अनिल काळे, ग्यानिराम साखरवाडे, दिनकर लांबट, अनिल काळे, पुंडलिक लेंडे, शालिक पंधरे प्रभारी, राजेश लेंडे यानंतर सत्यफुला लेंडे यांना ५ आॅक्टोबर १९४९ नंतर मोहगाव देवीच्या प्रथम नागरिक बनण्याचा सन्मान मिळाला. त्यांनी १२ नोव्हेंबर रोजी सरपंच पदाचा कार्यभार सांभाळला.
मावळते सरपंच राजेश लेंडे हे सत्यफूला लेंडे यांचे पती होत. महिलांना स्वयंरोजगार, मग्रारोहयोचे गाव, सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. गावचा विकास हाच संकल्प असल्याचे सरपंच सत्यफूला लेंडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.