पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 09:42 PM2018-08-03T21:42:59+5:302018-08-03T21:43:47+5:30

पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे. जिल्हयात पिक कर्ज वाटपासाठी महसूल विभागाच्या प्रयत्नाने ५५ हजार खातेधारक शेतकºयांना २२७ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हयातील वर्ग-२ च्या शेतजमीनी वर्ग-१ मध्ये समाविष्ट करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून सद्यस्थितीत ७० टक्के काम झालेले आहे.

With respect to the position of the post and revenue, the revenue system should work | पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे

पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : शेतकऱ्यांना सव्वादोन कोटींचे पीक कर्ज वितरीतलोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे. जिल्हयात पिक कर्ज वाटपासाठी महसूल विभागाच्या प्रयत्नाने ५५ हजार खातेधारक शेतकºयांना २२७ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हयातील वर्ग-२ च्या शेतजमीनी वर्ग-१ मध्ये समाविष्ट करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून सद्यस्थितीत ७० टक्के काम झालेले आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत ९५ टक्के शेतजमीनी वर्ग-१ होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
लाखनी येथील स्वागत लॉन येथे आयोजित जिल्हास्तरीय महसुल दिन कार्यक्रमाच्या उदघाटनपर भाषणात ते बोलत होते. यावेळी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, अर्चना मोरे, स्मिता पाटील, तहसिलदार संजय पवार, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक पाटील, लाखनीच्या नगराध्यक्ष ज्योतीताई निप्पाणे, मुरमाडीचे सरपंच सुनील भालेराव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, २०१९ हे वर्ष निवडणूकीचे वर्ष असणार असून भारत सरकार निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार कोणताही दिव्यांग व्यक्ती मतदानापासून वंचित राहता कामा नये. यासाठी समस्त जागरुक नागरिक व कर्मचाºयांनी दखल घ्यावी. सर्व नागरिकांची अचुक मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ई-वे आॅफिस संकल्पना राबविण्यात येत असून अर्जदारांच्या तक्रारींची दखल गंभीरतेने घेण्यात येईल. अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधितांना कळविण्यात येईल, असे ते म्हणाले.
या प्रसंगी आमदार रामचंद्र अवसरे म्हणाले की, राजस्व विभाग हे महत्वाचे असून समस्त नागरिकांचे जीवन या विभागावर अवलंबून आहे. वर्षानुवर्षे अतिक्रमण पट्टेधारक शेतकºयांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
प्रास्ताविकात अर्चना मोरे यांनी महसुल विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाºया योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या जात आहे.
तसेच साताबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. या महसूल दिन कार्यक्रमात मान्यवरांचे सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत २० लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश, नैसर्गिक आपत्ती योजनेतील १२ लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्यतेचे धनादेश, सातबारा वर्ग-२ चे वर्ग-१ मध्ये रुपांतरण झालेले ११ लाभार्थी, राशन कार्ड धारक ८ लाभार्थी तसेच मतदान ओखळपत्राचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी जिल्हयातील राजस्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना प्रशस्ती व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सोमनाथ माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन तहसिलदार मलीक विरानी यांनी केले. या कार्यक्रमास सातही तहसिलचे तहसिलदार, अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

Web Title: With respect to the position of the post and revenue, the revenue system should work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.