खुटसावरीत कोरोना लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:39 AM2021-08-28T04:39:32+5:302021-08-28T04:39:32+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य विभागाने दिलेले आहेत. आतापर्यंत तरी कोरोनाशी लढण्यासाठी रामबाण उपाय ...
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य विभागाने दिलेले आहेत. आतापर्यंत तरी कोरोनाशी लढण्यासाठी रामबाण उपाय मिळालेला नाही. मात्र लसीकरणाचा डोस घेतल्यास कोरोनाला दूर करण्याकरिता मदत शक्य असल्याने शासनाच्यावतीने लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. परंतु चुकीच्या संदेशाने ग्रामीण भागात लसीकरणकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करण्यात आले होते. लसीकरणाची टक्केवारी फारच कमी होती. परंतु लोकसहभाग व आरोग्य विभागाचे प्रबोधन कामी आले आहे. आरोग्य विभागाच्या नियमित सेवेने लाभार्थी लसीकरणात सहभागी होत आहेत. खुटसावरी येथील प्राथमिक शाळेत बुधवारी दिवसभरात १३५ नागरिकांनी लसीकरण केले. लसीकरण केंद्राला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे, डॉ. कविता कविश्वर, धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शहारे, डॉ. कैताडे, तलाठी राजकपूर बांबोर्डे आदींनी भेट दिली. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी वलथरे, शेंडे, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी आदींनी सहकार्य केले.
पिंपळगावचे लसीकरण पूर्णत्वाकडे
खुटसावरी गटग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिंपळगाव येथील काेरोना लसीकरण पूर्णत्वाकडे वाटचाल सुरु झाली आहे. बोटावर मोजण्याइतक्या जणांचे केवळ लसीकरण शि्ल्लक आहे. शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी शनिवार, २८ ऑगस्ट रोजी पिंपळगाव येथे लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शुक्रवारी जनजागृती करण्यात आली.