अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी कटीबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2016 12:32 AM2016-10-22T00:32:27+5:302016-10-22T00:32:27+5:30

केंद्रात व राज्यात काँग्रेस शासनाची सत्ता असतांना अल्पसंख्यांक समाजाच्या उत्थानाकरीता व विकासाकरीता अनेक योजना राबविण्यात आलेल्या आहेत.

Restricted for the development of minorities | अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी कटीबध्द

अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी कटीबध्द

Next

बाबा सिद्घीकी यांचे प्रतिपादन: अल्पसंख्यांक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची सभा
भंडारा : केंद्रात व राज्यात काँग्रेस शासनाची सत्ता असतांना अल्पसंख्यांक समाजाच्या उत्थानाकरीता व विकासाकरीता अनेक योजना राबविण्यात आलेल्या आहेत. यानंतरही अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी व विकासासाठी काँग्रेस पक्ष नेहमी कटीबध्द राहणार आहे, असे प्रतिपादन बाबा सिद्धीकी यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांनी गठीत केलेली नागपूर विभागीय अल्पसंख्याक समितीच्या भंडारा जिल्ह्यात दौऱ्यानिमित्य पक्षाचे अल्पसंख्याक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा गुरुदत्त मंगल कार्यालय येथे घेण्यात आली. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार आनंदराव वंजारी होते. प्रमुख अतिथी म्हणून समितीचे सदस्य व प्रदेश सरचिटणीस जिया पटेल, अल्पसंख्याक विभागीय अध्यक्ष ओवेश कादरी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊ त, पक्षनेता शमीम शेख, नगरसेवक पृथ्वी तांडेकर, अनुसुचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अजय गडकरी, नवाब पटेल, मनोज बागडे, ब्रम्हानंद करंजेकर, अजय तुमसरे, मार्तंड भेंडारकर, महेंद्र निंबार्ते, महेमुद खान उपस्थित होते.
आनंदराव वंजारी यांनी जिल्ह्यात सर्वधर्मसमभावाचे वातावरण असून नेहमी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाज जिल्हास्तरीय व शहरस्तरीय विकासात्मक मुद्दे हाती घेऊ न त्यांचा निवारण करण्याचा प्रयत्न पक्षाच्या वरिष्ठांच्या माध्यमातून करण्यात असल्याचे सांगीतले.
जिया पटेल यांनी काँग्रेसच्या शासन काळात जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजाकरीता राबविण्यात आलेल्या योजना व विकास कामाची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष पे्रमसागर गणविर यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस नेहमीच अग्रेसर राहील. कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यासाठी प्रयत्नरत राहावे, असे आवाहन केले. यावेळी अल्पसंख्यांक समाजातील अनेक नागरिकानी विचार मांडले.
याप्रसंगी भंडारा शहरातील प्रभाग क्र.९ मधील नागरिकांना काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून जाबीर मालाधरी, शफी उल्ला खान, शब्बीर अंसारी, जहिर मालाधरी, ईरफान पठान, अखतर अंसारी, हाजी करिमुद्दीन पठान, नाजीम अहमद, अखिल मिस्त्री, हाजी ईसराईल शेख, मो. शफी सिद्धीकी, सोहेल खान, अयुब खान, अजमद शेख, सलीम भाई, हबीब खान, कलीम अशरफी, जब्बार खान, शहा बाबु, ईसराईल शेख, प्रभाग क्र.१३- मुब्बशीर भाई, मुन्नाभाई, रशीद खत्री, लियाकत अली यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमाचे आयोजन शमीम शेख यांनी केले. संचालन प्रा. मकबुल वारसी व आभार प्रदर्शन सचिन घनमारे यांनी केले. यावेळी नाहीद परवेज, ईमरान पटेल, किशोर राऊ त, शाहिद अली, अयुब पटेल, मोहिश कुरेशी, सुरेश गोन्नाडे, संजय वरगंटीवार, गणेश निमजे, पराग खोब्रागडे, अखील तिवाडे, निखील कुंभलकर, विपुल खोब्रागडे, ईरफान पटेल, मुशीर पटेल, युसुफ पटेल, माजिद पटेल, उबेद पटेल, जाहिद पटेल, शहजाद पटेल, जफरभाई, साबिर भाई यांच्यासह समाजातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Restricted for the development of minorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.