तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा कोविड रुग्णालय सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:19+5:302021-04-04T04:36:19+5:30
तुमसर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असून त्या अनुशंगाने नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड ...
तुमसर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असून त्या अनुशंगाने नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड टेस्टिंग सेंटर व लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तालुक्यात प्रथमच काेरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला व १२७ रुग्ण तुमसर शहरात आढळून आले आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सामान्य जनतेला खासगी उपचार घेणे अवघड होत आहे. त्यामुळे बंद असलेला कोरोना रुग्णालय तत्काळ पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन बाळबुद्धे यांना केली. रुग्णालयाला आवश्यक असलेले ऑक्सिजन बेड , ऑक्सिजन सिलिंडर, जम्बो सिलिंडर आदी सर्व बाबी पूर्तता आहे असे सांगितले.