शैक्षणिक संस्थेचे पदभरती अधिकार कायम ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:23 AM2017-12-05T00:23:02+5:302017-12-05T00:23:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य खासगी अधिनियम १९८१ नुसार पदभरतीचे अधिकार संस्थेला असून ते कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा शैक्षणिक संस्था संचालक महामंडळ शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्यामार्फत निवेदन पाठविले आहे.
चुकीच्या संच मान्यता व होणाºया विलंबामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. २००४ पासून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांची भरती करण्याची परवानगी घेण्यात यावी, चुकीच्या पध्दतीने घेत असलेले अभियोग्यता चाचणी रद्द करण्यात यावी, शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या वेतनवाढीवर संस्थेचे अधिकार कायम पुर्वीप्रमाणे ठेवण्यात यावे, संस्थेच्या कर्मचाºयांच्या बढती व बदली संदर्भात शिक्षणाधिकारी यांच्या पुर्व परवानगी घेण्याची अट रद्द करावी, संस्थेच्या परवानगीशिवाय कुठल्याही कर्मचाºयांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचाºयांचे मेडीकल बिल मंजूर करण्यात येवू नये, मुख्याध्यापकांच्या सभेत शिक्षणाधिकारी यांनी व्यवस्थापन मंडळ यांना कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीचे अधिकार नाही असे स्पष्ट बोलु नये, वेतनोत्तर अनुदान सहाव्या वेतनाच्या ५ टक्के देण्यात यावे, थकीत असलेली वेतनोत्तर अनुदान रक्कम व्याजासह देण्यात यावी, संस्था संचालकांची प्रत्येक महिन्याला बैठक बोलविण्यात यावी, यासह अकरा मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकाºयांना सोपविण्यात आले.
जिल्ह्यातील राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी, नवप्रभात शिक्षण संस्था वरठी, चक्रधरस्वामी शिक्षण संस्था, रामकुवर संस्था भंडारा, भारतीय संस्था लाखांदूर, रमेश शिक्षण संस्था कुडेगाव, चक्रधर स्वामी संस्था बेलाटी, ज्ञानदीप शिक्षण संस्था सानगडी, विवेकानंद शिक्षण संस्था अड्याळ, प्रशांत शिक्षण संस्था आंधळगाव, देवी सरस्वती शिक्षण संस्था ठाणा व विनोद शिक्षण संस्था गोसे बुज. या खाजगी शाळा संस्थाचालकांनी निवेदन दिले. मागण्या निकाली काढण्यात याव्यात अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे. शिष्टमंडळात आल्हाद लाखनीकर, केशव लेंडे, सचिन लिचडे, दामोधर जांभूळकर, सत्यवान आजबले, दशरथ कारेमोरे, प्रशांत दोनाडकर, दिपक दोनाडकर, चंद्रकांत दिवटे, अजय शांडिल्य, हेमंत बांडेबुचे, निश्चय दोनाडकर, अन्ना फटे यांचा समावेश होता.