निलंबनाची कार्यवाही मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2017 12:32 AM2017-07-08T00:32:07+5:302017-07-08T00:32:07+5:30
मग्रारोहयोच्या हजेरीपत्रकाचे दिरंगाईचे सबब पुढे करून तुमसर तालुक्यातील तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मग्रारोहयोच्या हजेरीपत्रकाचे दिरंगाईचे सबब पुढे करून तुमसर तालुक्यातील तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. ती मागे घ्यावी या करीता तालुक्यातील ग्रामसेवक संघटना एकवटली व निर्णय मागे घेण्याकरिता आज ७ जुलैला पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले.
राकेश वैद्य, डी.बी. गायधने, एल.एस. घाटोळकर असे निलंबित केलेल्या ग्रामसेवकांची नावे आहेत. महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत निलंबनाने अदा करण्यात येणाऱ्या मजुरीवर नुकसान भरपाई देण्याबाबतचे शासन निर्णय आहे. त्या निर्णयात मग्रारोहयोच्या संपूर्ण कामाची जबाबदार अधिकारी कर्मचारी व यंत्रणेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला. यात कुठेही ग्रामसेवकाला जवाबदार ठरविण्यात आले नसताना हजेरीपत्रकाच्या दिरंगाईचे ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णयाला बगल देत अन्यायकारक निलंबनाची कार्यवाही तीन ग्रामसेवकांवर करण्यात आली.
सदर कार्यवाही तात्काळ मागे घेवून ग्रामसेवकांवर झालेल्या अन्याय दुर करावा या मागणीकरिता महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना शाखा तुमसरच्या वतीने पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन पुकारून कार्यवाहीचा ग्रामसेवकांनी निषेध नोंदविला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिल धमगाये, सचिन नरेंद्र सौदागर, दिनेश सिंदराम, शैलेश शेंडे, विद्या गजभिये, अश्विन डोहळे, राहुल कारेमोरे, पी.एच. येल्ले, एच.एम. पडोळे, डी.बी. गायधने, भांडारकर, डी.डी. सार्वे, राकेश वैद्य, निलेश गावनेर, एच.बी. कावळे, दुर्गा शेंडे, मुक्ता शेंडेसह तालुक्यातील असंख्य ग्रामसेवक उपस्थित होते.