मुलीसाेबत बोलण्याच्या वादातून पाच जणांनी खून केल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 05:00 AM2022-04-14T05:00:00+5:302022-04-14T05:00:36+5:30

मंगळवारी सायंकाळी माकडेनगरात माेनू आपल्या दुकानात बसला असता, आपल्या चार मित्रांना घेऊन रोशनने धारदार शस्त्राने खून केला.  सर्व आरोपी पसार झाले. या घटनेने तुमसर शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, तुमसर पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध भादंवि ३०२, १४३, १४७, १४८, १४९ कलमासह महाराष्ट्र पोलीस कायदा १३५, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये  गुन्हा दाखल केला.

Revealed that five people were killed in an argument over talking to a girl | मुलीसाेबत बोलण्याच्या वादातून पाच जणांनी खून केल्याचे उघड

मुलीसाेबत बोलण्याच्या वादातून पाच जणांनी खून केल्याचे उघड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर :  मुलीसोबत बाेलण्याच्या वादात आपला खून होईल, या भीतीतून सलून व्यावसायिक तरुणाचा पाच जणांनी खून केल्याचे उघड झाले आहे. तुमसर येथील माकडेनगरात मंगळवारी सायंकाळी धारदार शस्त्राने खून करण्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या पाच तासात या प्रकरणाचा छडा लावत तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह दाेन तरुणांना ताब्यात घेतले.
घनश्याम ऊर्फ रोशन रमेश भजने (२०, रा. माकडेनगर), शाम मनोहर कुंदवानी (२०, रा. शिवाजी वाॅर्ड, तुमसर) अशी आरोपींची नावे आहेत. उर्वरित तीन विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन बालके असून त्यातील एक तुमसर येथील तर दोघे मोहाडी तालुक्यातील एलोरा येथील आहेत. मोग्लायन ऊर्फ मोनू विनू गेडाम (२५, रा. आंबेडकर वाॅर्ड, तुमसर) असे मृताचे नाव आहे. 
आरोपी रोशन भजेने हा आंबेडकर वाॅर्डातील एका मुलीसोबत बोलत असे. त्यावरून मोनू व रोशन यांच्यात गत काही दिवसांपासून वाद होता. हा वाद विकोपाला गेला होता. 
यातून आपला खून होऊ शकतो, अशी भीती रोशनच्या मनात होती. त्यातूनच त्याने मोनूला संपवण्याचा कट रचला.

अवघ्या पाच तासात आरोपी जेरबंद

- मंगळवारी सायंकाळी माकडेनगरात माेनू आपल्या दुकानात बसला असता, आपल्या चार मित्रांना घेऊन रोशनने धारदार शस्त्राने खून केला.  सर्व आरोपी पसार झाले. या घटनेने तुमसर शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, तुमसर पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध भादंवि ३०२, १४३, १४७, १४८, १४९ कलमासह महाराष्ट्र पोलीस कायदा १३५, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये  गुन्हा दाखल केला. तपास तुमसरचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर करीत आहेत.

 

Web Title: Revealed that five people were killed in an argument over talking to a girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.