‘ते महसूल मंडळ’ नुकसानभरपाईसाठी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 10:42 PM2017-12-29T22:42:29+5:302017-12-29T22:43:17+5:30
तुमसर, मोहाडी तालुक्यात एकूण ११ महसूल मंडळ असून अंतिम आकडेवारीत सर्वच क्षेत्रातील धान पिकाची आकडेवारी सर्वच क्षेत्रातील धान पिकाची आकडेवारी पन्नास पैसेच्या आत आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : तुमसर, मोहाडी तालुक्यात एकूण ११ महसूल मंडळ असून अंतिम आकडेवारीत सर्वच क्षेत्रातील धान पिकाची आकडेवारी सर्वच क्षेत्रातील धान पिकाची आकडेवारी पन्नास पैसेच्या आत आहे. जिरायती शेतीत म्हणजे ज्यांचे सातबारा सिंचन नाही अशा शेतकºयांना ७ हजार ९७० रुपये हेक्टरी तसेच बागायती शेतीसाठी म्हणजे ज्यांची जमीन ओलीताखाली दाखविलेली आहे अशा शेतकऱ्यांना १४ हजार ६७० रूपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे आ. चरण वाघमारे यांनी सांगितले.
यापुर्वी धान उत्पादक शेतकऱ्यांनी दुष्काळी मदत देताना शासन जिरायतीचे म्हणजे ७ हजार ९७० रूपये नुकसानभरपाई शेतकऱ्यांना देत होते. परंतु यावर कृषीमंत्र्यासोबत चर्चा केल्यानंतर बागायती म्हणजे सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतीवर पिकाचे नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्यांना १४ हजार ६७० रूपये हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी केल्यावर शासनाने ही मदत जाहीर केली आहे. यामुळे तुमसर क्षेत्रातील मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील सर्व शेतकºयांना शासनाच्या मदतीचा फायदा मिळेल, अशी माहिती आ. चरण वाघमारे यांनी दिली.