खंडविकास अधिकारी सक्तीच्या रजेवर?
By admin | Published: May 26, 2016 01:36 AM2016-05-26T01:36:46+5:302016-05-26T01:36:46+5:30
येरली येथील रस्ता कामाची तज्ञाकडून चौकशी न करणे तथा मागील पाच महिन्यांपासून पंचायत समिती सभापतीसह इतर सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे ....
अधिकारी म्हणतात, वैद्यकीय रजेवर : सदस्य म्हणतात सक्तीच्या रजेवर
तुमसर : येरली येथील रस्ता कामाची तज्ञाकडून चौकशी न करणे तथा मागील पाच महिन्यांपासून पंचायत समिती सभापतीसह इतर सदस्यांना विश्वासात न घेता कामे करणे या व अन्य बाबींची वरिष्ठांकडे तक्रार केल्यावर खंडविकास अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
तुमसर पंचायत समिती कार्यालय मागील एका वर्षापूर्वी खंडविकास अधिकारी म्हणून केशव गड्डापोड रुजू झाले. त्यांची पहिलीच पोस्टींग आहे. सुरुवातीला काही महिने उत्तम कार्याची चूणूक त्यांनी दाखविली होती. तरुण खंडविकास अधिकारी व कर्तव्यदक्ष म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. परंतु पाच महिन्यांपासून पंचायत समिती सभापती व इतर सदस्यांना विविध विकास कामात विश्वासात ते घेत नाही म्हणून असंतोष होता.
२० दिवसापूर्वी येरली येथील सिमेंट रस्ता प्रकरणाची चौकशी संदर्भात दोन पत्रकार परिषदा झाल्या. यात चौकशी ही तज्ज्ञाकडून न करता विस्तार अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. चौकशी अहवालामागील सहा महिन्यापासून प्रलंबित आहे. दक्षता समितीला ते अनुपस्थितीत होते याकडे आमदार चरण वाघमारे यांनी लक्ष वेधले होते. १२ दिवसापूर्वी ते रजेवर गेले यासंदर्भात आ. वाघमारे यांनी उपखंडविकास अधिकाऱ्यांना प्रभार दिला का अशी विचारणा केली तेव्हा त्यांनी प्रभार दिला नाही असे उत्तर दिले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली. दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मनोज हिरूडकर यांच्याकडे प्रभाराचे पत्र दिले. (तालुका प्रतिनिधी)
कार्यकाळ पूर्ण
तुमसरचे खंडविकास अधिकाऱ्यांचा एका वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. परिविक्षाधीन खंडविकास म्हणून त्यांची नियुक्ती केल्याची माहिती आहे. उन्हाळा सुरु झाल्याने नविन खंडविकास अधिकारी स्थानांतरण झाल्यावर कार्यक्षेत्राची माहिती घेण्यास वेळ लागेल म्हणून शासनाने खंडविकास अधिकाऱ्यांचे स्थानांतरण प्रक्रीया थांबविली होती असे समजते. नविन खंडविकास अधिकाऱ्यांचे पुन्हा मुंबई व दिल्ली येथील प्रशिक्षण होणे शिल्लक आहे. अशातच त्यांना सक्तीच्या रजेवर धाडण्यात आले परंतु याबातीत अधिकारी स्पष्ट उत्तर देत नाहीत हे विशेष.