अंदाज समितीने घेतला बावनथडीचा आढावा

By Admin | Published: September 9, 2015 12:24 AM2015-09-09T00:24:03+5:302015-09-09T00:24:03+5:30

सिंचन प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अंदाज समितीने आज मंगळवारला तुमसर तालुक्यातील आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पाची पाहणी केली.

A review of Bavanthadi was taken by the estimation committee | अंदाज समितीने घेतला बावनथडीचा आढावा

अंदाज समितीने घेतला बावनथडीचा आढावा

googlenewsNext

प्रकल्पग्रस्तांशी केली चर्चा : समितीच्या नऊ आमदारांनी केली पाहणी
भंडारा : सिंचन प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अंदाज समितीने आज मंगळवारला तुमसर तालुक्यातील आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी या समितीने प्रकल्पाचा आढावा घेतला. ही समिती पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी करणार होते परंतु यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाची पाहणी केल्यामुळे या समितीने बावनथडीची पाहणी केली.
उद्या ९ सप्टेंबरला विदर्भातील अन्य प्रकल्पांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर नागपूर येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्य सरकारला निरीक्षण अहवारल सादर करणार आहेत. जालनाचे आमदार अर्जुन खोतकर अध्यक्ष असलेल्या या समितीत नऊ आमदारांनी मंगळवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास तुमसर तालुक्यातील बावनथडी सिंचन प्रकल्प स्थळाला भेट देऊन पाहणी केली.
या दौऱ्यात समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत तुमसरचे आमदार चरण वाघमारे, उत्तर नागपूरचे आमदार मिलिंद माने, यवतमाळचे आमदार मदन येरावार, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, धामनगावचे आमदार विरेंद्र जगताप, नेवासाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, नागपूरचे आमदार अनिल सोले उपस्थित होते.
या अंदाज समितीने बावनथडी प्रकल्पाचे सुक्ष्मरित्या निरीक्षण करुन भौगोलिक स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रकल्पाच्या प्रलंबित कामाची माहिती घेतली. भुमी संपादित किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे यासह प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. समितीच्या सदस्यांनी सुमारे तीन तास प्रकल्प स्थळावर पाहणी केली. या दरम्यान त्यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता समितीचे सदस्य नागपूरकडे रवाना झाले. या समितीच्या दौऱ्यात विदर्भ सिंच विकास महामंडळाचे निदेशक शुक्ला, भंडाराचे जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर उपस्थित होते.
आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्प २०१२ मध्ये पूर्ण झाला आहे. ११९ शेतकऱ्यांना भूमी संपादनासाठी ७२ कोटी रुपयांची गरज आहे. अपूर्ण कामांसाठी ११ कोटी आणि प्रस्तावित कामांसाठी ३७ कोटी असे एकूण १२० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. अंदाज समितीच्या दौऱ्यामुळे आपण समाधानी असून आता बावनथडी प्रकल्पाच्या प्रलंबित कामांना वेग येईल. शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळेल. प्रलंबित कामे पुर्ण करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया अंदाज समितीचे सदस्य आमदार चरण वाघमारे यांनी दिली.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: A review of Bavanthadi was taken by the estimation committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.