महाराष्ट्र वीज कामगार महासंघाची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:39 AM2021-08-28T04:39:29+5:302021-08-28T04:39:29+5:30
गत दोन वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या सात सभासद सभासदांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शंकरराव काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात ...
गत दोन वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या सात सभासद सभासदांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शंकरराव काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच वीज कामगार महासंघ यामध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या २३ सभासदांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात योगेश्वर सोनुले म्हणाले, संघटन कार्य करताना येणाऱ्या अडचणी आणि कोरोना महामारीमुळे आलेली मरगळ झटकून नव्या जोमाने कामाला लागले पाहिजे. यावर्षी होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकीत इच्छेने सभासदांनी समोर येऊन संघटनेचे नेतृत्व करावे, असे आवाहनही सोनुले यांनी उपस्थितांना केले. महामंत्री शंकरराव पहाडे यांनी, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ अर्थात महावितरण, महापारेषण कंपनी यांच्या समस्या प्रश्न आणि कंपन्यांची वर्तमान भूमिका तसेच संघटनात्मक पातळीवर सभासदांच्या विविध कार्य व कर्तव्याबद्दल मार्गदर्शन केले तसेच महावितरण कंपनीने आपल्या कार्यप्रणालीमध्ये कशी सुधारणा करावी, हे पटवून दिले. वेतनवाढ, भत्ता थकबाकी कामगारांना मिळवून देण्यासाठी महासंघाने केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली.
संचालन पारेषण विभाग सचिव महेश वाडेकर यांनी तर आभार भंडारा सर्कल सचिव राधेलाल बडवाईक यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी एकनाथ ढवळे, रंजित सव्वालाखे, सुधीर कावळे, गणेशकुमार चव्हाण, अशोक गोधर्य, निखिलेख गभने, सुनील बांगरे, शुभांगी इलमे, नीलिमा ढवळे, रवींद्र फटिंग, मनोज भगत, प्रभू मडावी, सचिंद्र आंबीलढुके, भाऊराव लेंडे, सचिन तलमले, नीरज मातीखाये, बाळकृष्ण सार्वे, गजानन काटेखाये, सौरभ गौरीहर, नितीन पाठक, मनीष बढे, चंद्रशेखर काकडे, जगदीश कावळे, चेतन गभणे, सीमा समर्थ, लक्ष्मण राखडे, यशवंत शिंदे, विनोद मते, सचिन डोंगरे, प्रदीप बांगर, निशांत कडव, विनोद पेशने, वसंत वहिले, दिलीप टिचकुले, सोमेश्वर बोंद्रे, अनिल ठाकरे, भुमेश्वरी शिवणकर, स्मिता मोटघरे, जगदीश कावळे, अमोल रहांगडाले, पुष्पा खेडकर, भारती भुरे, अतुल सार्वे, रेश्मा नंदनवार यांनी सहकार्य केले.