भंडारा येथे विविध विकास कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:31 AM2021-02-15T04:31:24+5:302021-02-15T04:31:24+5:30

प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेताना खासदारांनी जिल्ह्याचे उद्दिष्ट, प्रत्यक्ष सुरुवात झालेली कामे, शिल्लक कामे पूर्ण होण्याचा कालावधी याविषयी माहिती ...

Review of various development works at Bhandara | भंडारा येथे विविध विकास कामांचा आढावा

भंडारा येथे विविध विकास कामांचा आढावा

Next

प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेताना खासदारांनी जिल्ह्याचे उद्दिष्ट, प्रत्यक्ष सुरुवात झालेली कामे, शिल्लक कामे पूर्ण होण्याचा कालावधी याविषयी माहिती जाणून घेतली. ज्यांची नावे ग्रामपंचायतीच्या यादीतून वगळण्यात आली आहेत ती समाविष्ट करण्याच्या सूचनाही यावेळी खासदारांनी दिल्या. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेताना आगामी काळात कामाच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. १४ आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधी विनियोगाची माहितीही जाणून घेतली. आलेला निधी आणि झालेल्या खर्चाची माहिती जाणून घेताना यातून मंजूर असलेली कामे रेंगाळली असल्यास ताबडतोब पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. चालू वर्षाचा प्राप्त निधी आणि त्याच्या खर्चाच्या नियोजनासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.

राष्ट्रीय आरोग्य मिशन, दिशा समितीअंतर्गत कोरोना काळात केंद्र सरकारकडून जिल्ह्याला प्राप्त झालेला निधी व त्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकांना मिळालेल्या लाभासंदर्भात आकडेवारी खासदारांनी जाणून घेतली.

विविध विषयांचा आढावा घेतल्यानंतर खासदारांनी ग्रामीण भागातील योजनांच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा करू नये, असे स्पष्ट केले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आलेल्या प्रत्येक योजनेची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना खासदार मेंढे यांनी केल्या.

बैठकीला माजी आमदार चरण वाघमारे, बाळा काशीवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पानझाडे, मनिषा कुरसुंगे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, मोहन सूरकर, विनोद बांते, मयूर बिसेन, विकास मदनकर आदी उपस्थित होते.

Web Title: Review of various development works at Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.