सीईओंनी घेतला कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 09:29 PM2019-02-08T21:29:23+5:302019-02-08T21:29:43+5:30

उपतालुक्याचा दर्जा असणाऱ्या सिहोरा गावात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र जगताप यांनी भेट देऊन विविध विभागाची तथा कामांची पाहणी केली. याशिवाय शाळा आणि अंगणवाडीचे विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. विविध विकास कार्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.

Review of the work done by the CEOs | सीईओंनी घेतला कामांचा आढावा

सीईओंनी घेतला कामांचा आढावा

Next
ठळक मुद्देसिहोरा गावाला भेट : शाळेत विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : उपतालुक्याचा दर्जा असणाऱ्या सिहोरा गावात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र जगताप यांनी भेट देऊन विविध विभागाची तथा कामांची पाहणी केली. याशिवाय शाळा आणि अंगणवाडीचे विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. विविध विकास कार्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.
सिहोरा गावात असणाºया जिल्हा परिषद हायस्कूलने कात टाकण्यास सुरूवात केली आहे. एरवी या शाळेत विद्यार्थ्यांचा वनवा असताना या संख्येत वाढ झाली आहे. विद्यार्थी संख्येने तीन अंकी आकडा गाठला आहे. जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती धनेंद्र तुरकर यांचे प्रयत्नाने या शाळेत विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. यात गावकरी, शिक्षण समिती आणि प्राचार्य ओ.बी. गायधने यांचा सिहांचा वाटा आहे. शाळा बंद होण्याचे मार्गावर असताना पुन्हा शाळेने सकारात्मक प्रयत्नाने प्रगतीकडे वाटचाल करण्यास सुरूवात केली आहे. या शाळेची यशोगाथा जिल्ह्यात चर्चेचा विषय झाली आहे. या हायसकूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र जगताप यांनी भेट देवून पाहणी केली.
विद्यार्थी आणि शिक्षकासोबत संवाद साधला. याच हायस्कूलचे लगत नवीन वर्ग खोल्याचे बांधकाम करण्यात येत असल्याने इमारतीची पाहणी ज्यांनी केली. गावात असणाºया अंगणवाडी इमारतींना भेट देवून स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि बालकांची प्रगती या विषयी त्यांनी माहिती जाणून घेतली.
बालकांसोबत त्यांनी संवाद साधत अंगणवाडी सेविकांना काही सुचना दिल्या. याच गावात असणाºया पशु वैद्यकीय दवाखान्याची पाहणी त्यांनी केली. ग्रामपंचायत अंतर्गत गावात अनेक विकास कार्य करण्यात येत आहे. या कामाची स्थिती त्यांनी जाणून घेतली आहे. गावात लोकोपयोगी करण्यात येणारी कार्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र जगताप यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सिहोरा गावात विविध विभाग आणि कार्यालयाचे भेट त्यांनी घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर, तुमसर पंचायत समितीचे बिडीओ मोहोड, सहायक बिडीओ मिलिंद बडगे, विस्तार अधिकारी ठवरे, पंचायत समिती सदस्य अरविंद राऊत, प्राचार्य ओ.बी. गायधने, सरपंच मधु अडमाचे तथा अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Review of the work done by the CEOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.