जि.प.चे ११ कोटींचे सुधारित अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:25 PM2017-09-04T22:25:02+5:302017-09-04T22:25:21+5:30

ग्रामीण जनतेच्या विकासाचा कणा असलेला जिल्हा परिषद भंडाराने सन २०१७-१८ या वित्तीय वर्षाचे प्रथम सुधारित अंदाजपत्रक तयार केले आहे.

Revised budget of Rs.11 crores of ZP | जि.प.चे ११ कोटींचे सुधारित अंदाजपत्रक

जि.प.चे ११ कोटींचे सुधारित अंदाजपत्रक

Next
ठळक मुद्देनिधीत ५ कोटींची वाढ : १३ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत येणार विषय

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामीण जनतेच्या विकासाचा कणा असलेला जिल्हा परिषद भंडाराने सन २०१७-१८ या वित्तीय वर्षाचे प्रथम सुधारित अंदाजपत्रक तयार केले आहे. यात सुमारे पाच कोटी रुपयांची वाढ केली असून हे अंदाजपत्रक ११ कोटींच्या घरात आहे. १३ सप्टेंबरला होणाºया सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या सभाध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात आज औपचारिक बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्यासह सर्व विषय समिती सभापती ज्यात नरेश डोंगरे, विनायक बुरडे, निलकंठ टेकाम, शुभांगी रहांगडाले यांचा समावेश होता. यासह समिती सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदच्या प्रथम सुधारित अंदाजपत्रकात दरवर्षी ६ ते ७ कोटींची तरतुद करण्यात येते. मात्र यावर्षी उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनी यात भरिव वाढ केली आहे. ही वाढ एक दोन कोटीची नव्हे तर तब्बल ११ कोटींवर हा प्रथम सुधारित अंदाजपत्रक नेलेला आहे.
त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या अंदाजपत्रकात सुमारे पाच कोटींची वाढ करण्यात आलेली आहे. या अंदाजपत्रकाला आज पार पडलेल्या बैठकीत औपचारिकरित्या मान्यता प्रदान करण्यात आली. मात्र अंतिम मान्यतेसाठी हे अंदाजपत्रक १३ सप्टेंबरला होवू घातलेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सभागृहासमोर ठेवण्यात येणार आहे. अंदाजपत्रकानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषद प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे.

जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामीणांचा विकास साधण्याचे ध्येय ठेवण्यात आले. याकरिता अंदाजपत्रकात वाढ करण्याची शिफारस केली. त्या अनुषंगाने आज ११ कोटींच्या प्रथम सुधारित अंदाजपत्रकावर औपचारिक बैठक पार पडली. १३ सप्टेंबरला सर्वसाधारण सभेत मंजूरी मिळाल्यानंतर विकास कार्य झपाट्याने होईल अशी अपेक्षा आहे.
-राजेश डोंगरे, उपाध्यक्ष जिल्हा परिषद, भंडारा

Web Title: Revised budget of Rs.11 crores of ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.