पाणी पुरवठ्याच्या चार बंद योजनांचे पुनरूज्जीवन

By admin | Published: July 7, 2016 12:36 AM2016-07-07T00:36:38+5:302016-07-07T00:36:38+5:30

तालुक्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना किरकोळ दुरुस्ती अभावी बंद आहेत. जिल्ह्यातील चार नळ योजनांच्या

Revival of four water supply schemes | पाणी पुरवठ्याच्या चार बंद योजनांचे पुनरूज्जीवन

पाणी पुरवठ्याच्या चार बंद योजनांचे पुनरूज्जीवन

Next

१.५ कोटींचा निधी मंजूर : ३३ गावांना होणार लाभ
तुमसर : तालुक्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना किरकोळ दुरुस्ती अभावी बंद आहेत. जिल्ह्यातील चार नळ योजनांच्या पुनरूज्जीवनासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत १ कोटी ५ लक्षांची तरतूद करण्यात आली. या पेयजल योजनेत करडी, देव्हाडी, साकोली व घानोड येथील ३३ गावांना शुद्ध पाणीपुरवठा होईल.
करडी, देव्हाडी, साकोली व घानोड येथील पाणीपुरवठा योजना किरकोळ दुरुस्ती अभावी बंद होत्या. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बंद योजनांचे पुनरूज्जीवन करण्यात येणार असून ही कामे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे.
करडी पाणीपुरवठा योजना २० लक्ष, देव्हाडी ५० लाख, साकोली १५ लाख, घानोड १० लाख असा निधी प्राप्त होणार आहे. करडी ३ गावे, देव्हाडी ११ गावे, साकोली १७ गावे व घानोड २ गावांना पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा योजना पुनरूज्जीवनाबाबत आ.चरण वाघमारे, आ.बाळा काशीवार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी मुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांना भेटून समस्या निकाली काढण्याकरिता साकडे घातले होते. योजना कार्यान्वीत झाल्यास परिसरातील नागरिकांना पाणी उपलब्ध होईल. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Revival of four water supply schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.