मालगुजारी तलावांचे ‘पुनरूज्जीवन’
By admin | Published: March 20, 2016 12:37 AM2016-03-20T00:37:58+5:302016-03-20T00:37:58+5:30
मालगुजारी तलावांच्या खोलीकरणाचे काम वन विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. गावकऱ्यांना या तलावाचा लाभ होणार आहे.
आमगाव (दिघोरी) : मालगुजारी तलावांच्या खोलीकरणाचे काम वन विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. गावकऱ्यांना या तलावाचा लाभ होणार आहे.
यासाठी वनविभागाने कोका अभयारण्या जवळील गावे दत्तक घेतले आहे. या गावामध्ये वनविभागामार्फत अनेक लोककल्याणकारी कामे हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावातील मामा तलावांचे खोलीकरण करण्यात येत आहे. यामुळे गावालगतच्या शेतीची सिंचनाची समस्या सुटणार आहे. मामा तलावांचे खोलीकरण मागील अनेक वर्षांपासून रखडल्याने ते सपाट झाले आहे. त्यामुळे पाणी साठवन क्षमता कमी झाली आहे. पर्यायाने जनावरांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागते. यामुळे मत्स्यव्सवसायाला सुद्धा चालला मिळणार असून ढिवर बांधवांनासुद्धा रोजगार उपलब्ध होणार आहे. हे काम वन समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तलावाच्या खोलीकरणामुळे पाण्याची साठवणूक होवून गावातील पाण्याची पातळी वाढेल जेणे करून पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही. (वार्ताहर)