गणित ऑलिम्पियाड परीक्षेत नवजीवनचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:36 AM2021-02-16T04:36:09+5:302021-02-16T04:36:09+5:30
साकाेली : येथील नवजीवन कॉन्व्हेंट ॲण्ड इंग्लिश प्रायमरी स्कूल सीबीएसई जमनापूर/साकोली येथे गणित ऑलिम्पियाड परीक्षेचे पदक व प्रमाणपत्र वितरणाचा ...
साकाेली : येथील नवजीवन कॉन्व्हेंट ॲण्ड इंग्लिश प्रायमरी स्कूल सीबीएसई जमनापूर/साकोली येथे गणित ऑलिम्पियाड परीक्षेचे पदक व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बक्षीस वितरणाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मुजम्मिल सय्यद, तर उपप्राचार्य पांडुरंग राऊत, पर्यवेक्षिका शर्मिला कछवाह व वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने नवजीवन सीबीएसईमध्ये प्राचार्य सय्यद यांच्या मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या ४२ विद्यार्थ्यांना १६ सुवर्ण, १३ रजत व १३ कास्य पदकांचे वितरण करण्यात आले. या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी प्राचार्य मा. मुज्जमिल सय्यद यांनी पदक व प्रमाणपत्र वितरण करून सर्व विद्यार्थ्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय प्राचार्य मुजम्मिल सय्यद, उपप्राचार्य पांडुरंग राऊत, पर्यवेक्षिका शर्मिला कछवाह, गणित शिक्षक सतीश गोटेफोडे व समस्त शिक्षकवृंदास दिले.
सुवर्ण पदकाचे मानकरी ठरणारे विद्यार्थी देवांश झिंगरे, आराध्य भुते, आदित्य चौधरी, यश खंडारे, मधुरा हटवार, तेजश्री खुने, आर्यन वासनिक, रुत्विक दहीवले व टीना बावनकुळे, रजत पदकाचे मानकरी माही खोब्रागडे, मयंक बिस्वास, वंशिका मेश्राम, नेहा मासुरकर, स्वस्तिक व्यास, आर्यन वैद्य, शरयू चौधरी, लोकेश पटले तर कास्य पदकाचे मानकरी सुप्रिया नागापुरे, पीयूष खुजे, नम्रता लिल्हारे, देवयानी दोनोडे, विश्लेष बडोले, होमेश्वरी परशुरामकर, तेनिका चांदेवार व प्रणव हटवार ठरले. सूत्रसंचालन दीपिका चव्हाण तर आभार विशाखा पशिने यांनी मानले. कार्यक्रमाकरिता नवजीवनमधील शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.