सिंचन प्रकल्पांना पुनरुज्जीवित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:31 AM2018-03-23T00:31:07+5:302018-03-23T00:31:07+5:30
सिंचनाची सोय करणाऱ्या प्रकल्पांना सौर उर्जेची जोड देण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. यामुळे थकीत विज देयकाने भंगारात निघालेल्या सिहोरा परिसरातील दोन प्रकल्पांना संजिवनी....
ऑनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : सिंचनाची सोय करणाऱ्या प्रकल्पांना सौर उर्जेची जोड देण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. यामुळे थकीत विज देयकाने भंगारात निघालेल्या सिहोरा परिसरातील दोन प्रकल्पांना संजिवनी व पुनरुज्जीवित करण्याची ओरड सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे अनेक हेक्टर शेती बारमाही ओलिताखाली येणार आहे.
बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन योजना मंजूर होण्यापूर्वी सिहोरा परिसरात असणाºया वैनगंगा नदीवर शेतकºयांनी स्वत:च सिचंनाची सोय करण्यासाठी प्रकल्प उभारले आहे. गाव व शेजारी गावाचे हद्दीत अंदाजे ६०० हेक्टर आर शेती ओलिताखाली आणण्याचे कार्य या बंद असणाºया प्रकल्पांनी केले आहे. बारमाही १२०० हेक्टर आरहून अधिक शेती सिंचित करण्याची क्षमता दोन प्रकल्पात आहे. बपेरा आणि पिपरी चुन्ही गावात स्वत: प्रकल्पाचे नहर असणारी ही प्रकल्प दिमाखात उभी आहे. प्रकल्पस्थळात वाढते विजेचे देयक आणि धान पिकाचे नुकसान यामुळे पाणीपट्टी कराचे देयक शेतकºयांनी केले नाही.
याशिवाय निधीअभावी पंपगृहांची दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे प्रकल्प बंद करण्याचा निर्णय समितीने घेतला. गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पाची वास्तू उभी असताना पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले नाही. याच काळात वैनगंगा नदी पात्रात उन्हाळ्यात पाण्याची समस्या होती. परंतु आता नदी पात्रात बारमाही पाणी राहत आहे. या प्रकल्पांना पुनरुज्जीवित करण्यासाठी आर्थिक मदतीची जोड देण्याची गरज आहे. बारमाही सिंचनाची सोय करण्यासाठी बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन योजना असली तरी या योजनेने १४ हजार हेक्टर आर शेतीला बारमाही कधी ओलीताखाली आणले नाही. यामुळे वैनगंगा नदी काठावर असणारे बपेरा आणि पिपरी चुन्ही गावातील दोन्ही प्रकल्प शेतकºयांना 'सोने पे सुहागा' ठरणारी आहेत. दरम्यान शासनाने प्रकल्पांना सौर उर्जेवर आणण्याचे प्रयत्न सुरू केली आहेत. यामुळे शेतकºयांना स्वस्त दरात पाणी सिंचनासाठी मिळणार असले तरी, उन्हाळ्यात सोंड्याटोला प्रकल्प नदी पात्रातून पाण्याचा उपसा करू शकत नाही. यामुळे बारमाहीचे स्वप्न दिवास्वप्न ठरणार असल्याने बपेरा व पिपरी चुन्हीचे बंद असणारे प्रकल्प सुरू करण्याची ओरड आहे.
बपेरा आणि पिपरी चुन्हीत बंद असणाºया प्रकल्पांना नव्याने पुनरुज्जीवित केल्यास शेतकºयांना बारमाही सिंचनाची सोय होणार आहे. राज्य शासनाने लक्ष केंद्रीत करण्यासाठी शेतकºयांचे स्वाक्षरीनिशी पत्र पाठविणार आहे.
-मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ, सिंदपुरी.