ओबीसींनी काढला शहरातून क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:14 PM2018-12-26T22:14:39+5:302018-12-26T22:14:56+5:30

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांची दखल न घेतल्यामुळे ओबीसी क्रांती मोर्च्याच्या वतीने बुधवारी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. यात विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

Revolutionary movement from OBC | ओबीसींनी काढला शहरातून क्रांती मोर्चा

ओबीसींनी काढला शहरातून क्रांती मोर्चा

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : ओबीसींची जनगणना करा, समस्यांचा वाचला पाढा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांची दखल न घेतल्यामुळे ओबीसी क्रांती मोर्च्याच्या वतीने बुधवारी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. यात विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी क्रांतीमोर्चाचे संयोजक संजय मते, सुखराम देशकर, के. झेड. शेंडे आदींनी केले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे २ आॅगस्ट २०१८ रोजी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने मुक मोर्चा काढून ओबीसी समाजाच्या मुख्य मागण्यासंदर्भात प्रशासनाला अवगत करण्यात आले होते. परंतू शासनाने त्याची दखल घेतली नाही. शासनाला जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या पावलावर पावले ठेवून ओबीसी समाज तिव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला.
ओबीसींची जनगणना करण्यात यावी, घरकुल देण्यात यावे, शेतकऱ्यांना मोफत विज पुरवठा करण्यात यावा, आरक्षणांतर्गत अन्य प्रवर्गाप्रमाणे शिष्यवृत्तीमध्ये सवलत लागू करण्यात यावी, ओबीसींना आरक्षण टक्केवारीनुसार देण्यात यावे, सर्व जातीला क्रिमीलीअरची अट रद्द करण्यात यावी, शासकीय रिक्त पदे भरण्यात यावी, विद्यार्थिनींप्रमाणे विद्यार्थ्यांनाही मोफत एसटीप्रवास पास देण्यात यावी, टीसी व जन्मप्रमाणपत्र हेच जातीचे प्रमाणपत्र मानण्यात यावे, जात पडताळणीचा गोरखधंदा बंद करण्यात यावा, परिक्षाशुल्क रद्द करावी, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सर्व विद्यार्थीनींना लागु करण्यात यावी, गणवेश भत्ता सर्व विद्यार्थ्यांना देण्यात यावा, ओबीसी मागासवर्गीयच असल्यामुळे अट्रासिटीचे गुन्हे दाखल करणे बंद करावे आदी मागण्यांचा समावेश आहे. जलाराम चौक येथून निघालेला हा मोर्चा गांधी चौक मार्गे शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेल्या पुढाºयांनी व अन्य वक्त्यांनी भाषणे दिली. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. याप्रसंगी संजय मते, सुखराम देशकर, के. झेड. शेंडे, अ‍ॅड. एस. व्ही. हलमारे, कुंदा वैद्य, उमेश मोहतुरे, बालु ठवकर, महेश जगनाडे, नेहाल भुरे, पुरुषोत्तम नंदुरकर, मधुकर भोपे, अश्विनी नंदुरकर, ज्योती नंदुरकर, अक्षय झंझाड, पंकेश काळे, नलिनी काळे, मुरलीधर भर्रे, सुभाष शेंडे, एस. डब्ल्यू. ठवकर, एन.टी. फुंडे, भुपेंद्र निर्वाण, कुंजबिहारी नेरकर, संजय बांते, आर. एन. मेहर, यशवंत भोयर, सुभाष आजबले, निखिल चवळे आदी उपस्थित होते.

Web Title: Revolutionary movement from OBC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.