रानगव्यांचा शेतात धुडघूस, पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:06 AM2021-03-04T05:06:17+5:302021-03-04T05:06:17+5:30
आमगाव येथील दिलीप बोंद्रे राजू बोंद्रे यांनी यावर्षी आपल्या शेतामध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली रविवारच्या रात्रीला रानगव्याचा कळप ...
आमगाव येथील दिलीप बोंद्रे राजू बोंद्रे यांनी यावर्षी आपल्या शेतामध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली रविवारच्या रात्रीला रानगव्याचा कळप धान पिकाची नासाडी करताना आढळून आला. धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या रानगव्यांचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याआधी अशोक बोंद्रे, राजू बोंद्रे व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा पिकाची रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. मोठ्या आशेने शेतकरी शेतात पिके पिकवीत असताना आले. या पिकावर वन्यप्राणी ताव मारत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवून नेल्या जात आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र, आतापर्यंत कोणत्याच प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. अभयारण्याची निर्मिती झाल्यामुळे या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आढळून येतात. शेतातील पिकांची नासधूस डोळ्यादेखत दिसत असतानासुद्धा शेतकरी काहीच करू शकत नाहीत. शेतकऱ्यांनी शेतीतील पिके वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. अभयारण्यामध्ये रस्त्याच्या कडेला जरी उतरले तरी अभयारण्यातील अधिकाऱ्यांनी अनेकांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, अभयारण्यातील वन्य प्राणी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पिकाची नासधूस करत असतानासुद्धा अभयारण्यातील अधिकारी व कर्मचारी मूग गिळून बसलेले आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अभयारण्याकडून कोणत्याच प्रकारच्या उपाययोजना करताना दिसून येत नाही. वन्य-प्राणी राखण्यासाठी अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा उपस्थित असतानासुद्धा वन्य प्राणी बाहेर कसे पडतात, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अभयारण्याला काटेरी कुंपण घालावे, अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. मात्र, शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही.