राशन दुकानातील डाळ महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:13 PM2019-05-13T23:13:34+5:302019-05-13T23:13:55+5:30

स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून कार्डधारकांना पुरविण्यात येणाऱ्या तुळ डाळीच्या किमतीत गत महिन्यापासून आणखी भर घालत भाववाढ करण्यात आली असल्याने आताही तुरडाळ ५५ रूपये प्रती किलो दराने विकली जात आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत डाळीचे दर वाढविल्याने राशन कार्डधारक संताप व्यक्त करीत आहेत.

Rice shop dal is expensive | राशन दुकानातील डाळ महागली

राशन दुकानातील डाळ महागली

googlenewsNext
ठळक मुद्देतूळ डाळ २० रूपये तर चणा डाळ ५ रूपयांनी महागली

राहुल भुतांगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून कार्डधारकांना पुरविण्यात येणाऱ्या तुळ डाळीच्या किमतीत गत महिन्यापासून आणखी भर घालत भाववाढ करण्यात आली असल्याने आताही तुरडाळ ५५ रूपये प्रती किलो दराने विकली जात आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत डाळीचे दर वाढविल्याने राशन कार्डधारक संताप व्यक्त करीत आहेत.
स्वस्त धान्य दुकानातून मापक दराने धान्य पुरविले जाते. मात्र याला नखे लावण्याचे काम सुरू झाले आहे. मार्च महिन्यापर्यंत ३५ रूपये दराने मिळणारी तुरडाळ एप्रिल महिन्यात ती ४५ रूपयाला मिळाली व त्याच महिन्यात अचानकच आणखी डाळीचे भाव वाढविण्यात आले. आता तुरडाळ ५५ रूपये दराने विकली जात आहे. किलोमागे तब्ब्ल २० रूपयांची भाव वाढ एकाच महिन्यात करण्यात आली. चणाडाळ यापूर्वी ३५ रूपये किलो दरानेच राशन दुकानात विकली जायची. परंतु आता याही डाळीचे दर ५ रूपयांनी वाढविण्यात आले आहेत.
बाजारभावाच्या तुलनेत शहरात दुकानात डाळ स्वस्तात मिळत असल्याने कार्डधारक दुकानातून डाळी खरेदी करीत होते. मात्र आता दर वाढविल्याने गरिबांना डाळ खरीदने शक्य नाही. परिणामी गरिबांच्या ताटातून वरण गायब होण्याची भीती निर्माण झाली आहे. तुळडाळ यापूर्वी लाभार्थ्यांना ३५ रूपयात विकली जायची, त्यावेळी ती स्वस्त धान्य दुकानदारांना ३१ रूपयाला पडायची व चार रूपये कमिशन दिल्या जात होते. आता डाळीचे दर वाढवून ५५ रूपये करण्यात आले. आता ही डाळ स्वस्तधान्य दुकानदारास ५३.५० पैसे दराने मिळत असून केवळ दीड रूपया कमिशनच मिळत असल्याने दुकानदारही डाळ आणण्यास अनुत्सूक दिसून येत आहे. परंतु बळजबरीने त्यांच्या माथी थोपवली जात असल्याने डाळ खरेदी करण्यासाठी विनंती करावी लागत आहे. त्यावरही दुकानदारांना ग्राहकांच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याचे चित्र आहे.

वाढती माहागाई व धान्य ने-आण करण्याचा खर्च पाहता अतिशय तोटक कमिशन दुकानदारांना देवून शासनाने बोळवण केली आहे.
-अरविंद कारेमोरे, जिल्हाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना.

Web Title: Rice shop dal is expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.