केसलवाडा वाघ येथे नाली खोदकामाने रिक्षाचालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:36 AM2021-02-24T04:36:33+5:302021-02-24T04:36:33+5:30
शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत अड्याळपर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले. सध्या रस्त्यालगत नाल्या व आच्छादन तयार करण्याचे काम सुरू आहे. मुख्य ...
शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत अड्याळपर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले. सध्या रस्त्यालगत नाल्या व आच्छादन तयार करण्याचे काम सुरू आहे. मुख्य मार्गापासून केसलवाडा वाघ येथे गावाकडे जाणाऱ्या जोडमार्गावर कंपनीद्वारे नालीचे खोदकाम करण्यात आले. विशेष म्हणजे आवागमन करणा-या नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी काम सुरू असल्याचा फलक लावणे, नालीवर पाट्या किंवा टिन मांडून तात्पुरती सोय करणे अनिवार्य होते. परंतु त्याबाबत कोणतेही तसदी घेण्यात आली नाही. या नालीत सायकल रिक्षासह पडून बन्सी मांढरे हा जखमी झाला. यात त्याचा रिक्षाही मोडला आहे तर दुखापतही झाली. सायकलस्वार शिवाजी चेटुले हा सुद्धा नालीत पडून जखमी झाला. याबाबत पोलीस तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. नालीचे काम दर्जेदार नसल्याने एखादे जड वाहन गेल्यास वजन पकडत नाही. दोन वर्षांपासून काम सुरू असून नालीच्या कडा मुरमाऐवजी माती टाकून बुजविल्या जात आहेत.
अभियंता नंदनवार ठेकेदारांची पाठराखण करीत आहेत. बोअरवेल जवळ नालीचे गडर बनविल्याने बोअरचे पाणी दूषित होत आहे. या समस्येचे निराकरण करावे अशी मागणी जनकल्याण अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष दिनेश वासनिक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरी खोडपे, सुनील मिरासे, योगेश चेटुले, हरी वाघये, शशिकांत रामटेके, खोडपे यांनी केली आहे.