जीर्ण जलकुंभाने अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:42 AM2021-09-07T04:42:39+5:302021-09-07T04:42:39+5:30

५० वर्षांपूर्वी ही पाण्याची टाकी ग्रामीण पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद, भंडारा यांनी निर्माण केली होती. त्यावेळेस ग्रामपंचायत कार्यरत होती. ...

Risk of accident due to dilapidated water hyacinth | जीर्ण जलकुंभाने अपघाताचा धोका

जीर्ण जलकुंभाने अपघाताचा धोका

Next

५० वर्षांपूर्वी ही पाण्याची टाकी ग्रामीण पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद, भंडारा यांनी निर्माण केली होती. त्यावेळेस ग्रामपंचायत कार्यरत होती. नंतर नगरपंचायत व आता नगरपरिषद कार्यरत आहे. दोन लक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेली ही टाकी सद्यस्थितीत जीर्ण अवस्थेत आहे. या संबंधाने ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व नगरपरिषद यांना ती टाकी पाडण्याचे आदेश आलेले आहेत. शहरातील वॉर्डसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था करावी अशा स्वरूपाचे आदेश वर्षापूर्वी आले आहे. मात्र नगरपरिषद प्रशासनाने शहरवासीयांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्थासुद्धा केली नाही.

कोट

जलकुंभ पाडण्याचे आदेश आले असून, संबंधित विभागांकडून मान्यता घेण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहेत. तसेच वाॅर्डमध्ये पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

दंतूरवार, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नगरपरिषद, साकोली

Web Title: Risk of accident due to dilapidated water hyacinth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.