रेंगेपारला भूस्खलनाचा धोका!

By admin | Published: July 15, 2016 12:44 AM2016-07-15T00:44:37+5:302016-07-15T00:44:37+5:30

मागील दहा वर्षांपासून रेंगेपार येथे वैनगंगा नदी झपाट्याने गावाच्या दिशेने वाढत आहे. सध्या वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.

The risk of landslide rains! | रेंगेपारला भूस्खलनाचा धोका!

रेंगेपारला भूस्खलनाचा धोका!

Next

मोहन भोयर तुमसर
मागील दहा वर्षांपासून रेंगेपार येथे वैनगंगा नदी झपाट्याने गावाच्या दिशेने वाढत आहे. सध्या वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. येथील १२ घरांना भुस्खलनाची भिती आहे. नदीपात्र व या घरांचे अंतर दोन ते तीन फूट एवढेच शिल्लक आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. १२ घरे वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुमसरपासून १५ कि़मी. अंतरावर रेंगेपार हे १३०० लोकवस्तीचे गाव वैनगंगा नदी काठावर वसले आहे. शेतकरी तथा शेतमजूरांचे या गावात वास्तव्य आहे. प्रचंड रेती उपश्यामुळे नदीचा प्रवाह येथे बदलला. गावाच्या दिशेने मागील १० वर्षात वैनगंगा झपाट्याने येऊ लागली. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नदी पात्रात गिळंकृत झाल्या. मागील दोन ते तीन वर्षापासून नदीकाठावर येथील १२ घरे आली आहेत. या घरांना पुराचा धोका आहे. त्यांच्याजवळ येथे राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जीव धोक्यात घालून त्यांना येथे राहावे लागत आहे. येथे विजयकलाबाई भुरे, अशोक उके, आनंदराव सोनेवाने, प्रमानंद ठाकरे, अंबर शेंडे, रामभाऊ नागपुरे, ब्रिजलाल मोरांडे, बाबुलाल मोरांडे, गुलाब कावळे, कला शेंडे, हंसराज माहुले, कंठीराम नागपुरे यांचे वास्तव्य आहे.
सन २००७-०८ मध्ये सर्वप्रथम पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे यांनी आंदोलन उभारले होते. तेव्हा हे गाव प्रकाशझोतात आले. तत्कालीन आमदार नाना पटोले यांनी स्वातंत्र्यदिनी जलसमाधी घेण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. पुढे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राज्याच्या विधीमंडळात प्रश्न चर्चेला आला. येथे बाधीतांना शासनाने भुखंड दिले, परंतु भुखंडावर घरे बांधून दिली नाही. भूखंड मिळून पाच वर्षे झाली, परंतु आर्थिक स्थिती बेताची असल्याने या कुटूंबांनी अजुनपर्यंत घरे बांधली नाही. वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे. हळूहळू भूस्खलनाची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. बाजूला सिलेगावकडे जाणारा रस्त्याहून वाहतुकही सुरू आहे. भूस्खलनात ही घरे नदी पात्रात गडप होण्याचा धोका आहे. रेंगेपार येथील जिल्हा परिषदेची शाळा सुद्धा नदी पात्राजवळच आहे. कुतुहल म्हणून नदीकडे जाण्याचा मोह विद्यार्थ्यांना निश्चितच होतो. येथे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे सुट्टीत लक्ष द्यावे लागते. लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाने येथे प्रत्यक्ष जावून पाहणी करण्याची गरज आहे. एक विशेष बाब म्हणून येथे १२ कुटूंबाना घरे बांधून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची गरज आहे. तात्पुरता निवाऱ्याची व्यवस्था येथे प्रशासनाने करण्याची गरज आहे.

शासन व प्रशासनाकडे अनेकदा निवेदने व विनंती करण्यात आली, परंतु त्याचा काहीच फायदा होतानी दिसत नाही. येणाऱ्या पुढील काळात जनआंदोलन उभारावे लागेल.
-हिरालाल नागपुरे,
गटनेता पं.स. तुमसर.

 

Web Title: The risk of landslide rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.