तुमसर गोंदिया मार्गाला भूस्खलनाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:03 PM2018-07-11T22:03:32+5:302018-07-11T22:03:51+5:30
तुमसर रोड येथे ५३२ रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे कामे सुरू आहेत. पुल बांधकामाकरिता एक मोठा विहिरीसारखा खड्डा अपघाताला आमंत्रण देत आहे. मागील एक महिन्यांपासून काम बंद आहे. तुमसर गोंदिया राज्य मार्गाशेजारी खड्डा असून भूस्खलनाचा येथे धोका निर्माण झाला आहे. सुरक्षिततेअभावी वाहन धारकांना येथे धोक्याची शक्यता आहे.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर रोड येथे ५३२ रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाचे कामे सुरू आहेत. पुल बांधकामाकरिता एक मोठा विहिरीसारखा खड्डा अपघाताला आमंत्रण देत आहे. मागील एक महिन्यांपासून काम बंद आहे. तुमसर गोंदिया राज्य मार्गाशेजारी खड्डा असून भूस्खलनाचा येथे धोका निर्माण झाला आहे. सुरक्षिततेअभावी वाहन धारकांना येथे धोक्याची शक्यता आहे.
तुमसर रोड येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. मुख्य कॉलमपर्यंत बांधकाम करण्याकरिता मोठा खड्डा तयार करण्यात आला. देव्हाडी गावात जाण्याकरिता रस्ता पाहिजे. याकरिता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामास विरोध केला. आधी रस्ता सोडा किंवा अंडरपास तयार करा, कायम रस्ता बंद करू देणार नाही, अशी भूमिका शिवसेना पदाधिकाºयांनी घेतल्यामुळे काम बंद करण्यात आले.
एक महिन्यापासून काम बंद आहे. पावसाचे पाणी खड्ड्यात साचले असून तलावाचे रुप खड्ड्याला आले. १० ते १२ फूट खोल खड्डा आहे. खड्ड्याला लागूनच तुमसर गोंदिया राज्य मार्ग आहे. खड्ड्याच्या काठावर जड वाहतूक करणारे ट्रक उभे राहतात. खड्ड्याला सुरक्षिततेचे कवच नाही. केवळ एका बाजूला सिमेंट दगड लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात भूस्खलन होऊन रस्ता खड्ड्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ५० ते ६० व ७० टनाचे ट्रक येथून दररोज ये जा करतात. नियोजनाचा अभाव येथे दिसून येतो. उड्डाणपुलाची कामेही कासवगतीने सुरु आहेत. राज्य शासन व रेल्वे विभागाचा संयुक्त उड्डाणपुल आहे. मागील चार वर्षापासून कामे सुरु आहेत. रेल्वेने कामाला काही दिवसापूर्वी सुरुवात केली. मोठी यंत्रे आणून ठेवली. यंत्राने व वाहनाने जागा व्यापली, परंतु कामे अजूनपर्यंत सुरु झाली नाही. एक दोन कामे वगळता कामे जैसे थेच आहेत.
रेल्वे ट्रॅकवरील वीज खांब येथे सिमेंट खांबाला अडसर ठरत असल्याची माहिती आहे. तुमसर गोंदिया राज्य मार्गावरील खड्ड्याबाबत निर्णय घेण्याची येथे गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, मोहाडी व उड्डाणपुल बांधकाम विभागाने तात्काळ दखल न घेतल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.