उमरवाडा वैनगंगेत गिळंकृत होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:42 PM2017-09-23T23:42:16+5:302017-09-23T23:42:31+5:30

 The risk of vandalism in Umarwada Wainganga | उमरवाडा वैनगंगेत गिळंकृत होण्याचा धोका

उमरवाडा वैनगंगेत गिळंकृत होण्याचा धोका

Next
ठळक मुद्देउमरवाडा, बोरी, कोष्टी येथील ९२ हेक्टर शेती नदीपात्रात गेली

मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जीवनदायिनी वैनगंगा नदीकाठ एकेकाळी सुपीक जमिनीसाठी ओळखला जात होता. मागील ८ ते १० वर्षात उमरवाडा गावासह परिसरातील चार ते पाच गावाच्या दिशेने नदी पात्र झपाट्याने पुढे सरकत आहे. आतापर्यंत सुमारे ९२ हेक्टर सुपीक शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. शासन व प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर अख्खे गाव गिळंकृत होण्याची भिती आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यांच्या सीमेवरून वैनगंगा नदी वाहते. तुमसर तालुक्यातील उमरवाडा गावाजवळून वैनगंगेचे पात्र आहे. मागील ८ ते १० वर्षात उमरवाडा नदी काठावरील अनेक शेतकºयांच्या सुमारे ३० ते ३१ हेक्टर शेती नदी पात्रात गिळंकृत झाली आहे.
उमराडासह, बोरी, कोष्टी येथील ९२ हेक्टर शेती नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. अतिशय सुपिक शेती म्हणून या गावातील शेती ओळखली जाते. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आला तर शेती नदी पात्रात समाविष्ट होण्याचा क्रम सुरूच आहे. अनेक लहान मोठ्या शेतकºयांच्या शेती नदीने गिळंकृत केल्या आहेत.
रोशन मेश्राम यांची उमरवाडा येथील नदीकाठावरील सुमारे ४.५० एकरशेती नदीपात्रात समाविष्ट झाली आहे. शासनाकडून आतापर्यंत कोणतीच दखल घेण्यात आली नाही. नदी पात्र दरवर्षी गावाच्या दिशेने सरकत असल्याने गावाला येथे धोका निर्माण झाला आहे.
शासन दरबारी ४२ हेक्टर शेती नदी पात्रात समाविष्ट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. उमरवाडा व धाटकुरोडा येथील रेतीघाट शासनाने यापुर्वी लिलाव केले होते. बेसुमार रेती उपसा तिथे करण्यात आला. त्याचा फटका येथे बसल्याची माहिती आहे. सन २००२ व २००३ मध्ये येथे रेतीघाट लिलाव करण्यात आला होता.
उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हणी येथील शेती नदी पात्रात गेल्याची माहिती शासनाला माजी आमदार अनिल बावणकर यांनी केली होती. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी सच्चिन्द्रप्रताप सिंग तथा तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमरवाडा,
बोरी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. रेतीघाट लिलाव प्रक्रिया तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी येथे स्थगित केली होती. उमरवाडासह इतर नदी काठावरील १८ विहिरी नदीपात्रात समाविष्ट झाल्या आहेत हे विशेष.
दुष्काळाचा फटका
तुमसर तालुक्यात १९४८, १९४३ व १९४४ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. तुमसर शहराला कोष्टी पंपगृहातून पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे नदी पात्रात तात्पूरती पाण्याकरिता वळणमार्ग करण्यात आला होता. पावसाळ्यात या वळणमार्गाने पाण्याचा प्रवाह्य बदलल्याची माहिती वयोवृद्धांनी दिली. शेकडो नागरिकांनी तेव्हा लोकसहभागातून हा वळणमार्ग तयार केला होता.

उमरवाडासह बोरी, कोष्टी व बाम्हणी गावाकडे नदी पात्र सरकत असून शेकडो एकर शेती नदीपात्रात जाणे सुरूच आहे. शासनाने दखल घेऊन उपाययोजना करावी.
-रोशन मेश्राम, शेतकरी उमरवाडा.
वैनगंगा नदीपात्र दिवसेंदिवस गावाकडे सरकत आहे. शेती गेलेल्या शेतकºयांनाम मोबदला शासनाने द्यावा. गावांचे संरक्षण करण्याच्या उपाययोजना शासनाने राबवावी. वैज्ञानिक उपाययोजना काय करता येईल याकरिता जिल्हाधिकाºयांनी शासनाला कळविण्याची गरज आहे.
-के. के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य देव्हाडी.

Web Title:  The risk of vandalism in Umarwada Wainganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.