ठाणा येथील आरओ संच सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:08 PM2018-03-05T22:08:02+5:302018-03-05T22:08:02+5:30

सहा महिन्यापूर्वी सुरु झालेला ठाणा पेट्रोलपंप येथील शुध्द पाण्याचा आरो एक आठवड्यापासून नादुरुस्त अवस्थेत होता.

The RO set started in Thane | ठाणा येथील आरओ संच सुरु

ठाणा येथील आरओ संच सुरु

Next
ठळक मुद्देमहिलांना दिलासा : जुना ठाणा येथील संच ‘जैसे थे’

आॅनलाईन लोकमत
जवाहरनगर : सहा महिन्यापूर्वी सुरु झालेला ठाणा पेट्रोलपंप येथील शुध्द पाण्याचा आरो एक आठवड्यापासून नादुरुस्त अवस्थेत होता. याविषयी लोकमतने ‘आरो संच नादुरुस्त’ या आशयाची बातमी प्रकाशित केली. लगेच प्रशासनाने दखल घेत अखेर आरो सुरु केले. याबाबद जनतेनी ‘लोकमत’चे आभार मानले.
शुध्द पाणी जनतेला मिळावे या हेतुने जिल्हा टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्हा परिषद भंडाराद्वारे प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येनुसार नागनदीचे दूषीत पाणीपुरवठा होत असलेल्या गावाना आरोची मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंप येथे दोन आरो संचाचे बांधकाम करण्यात आले. जुना ठाणा डॉ. आंबेडकर वॉर्ड क्रमांक चार व महात्मा फुले वॉर्ड क्रमांक पाच मध्ये चार -चार आठ लक्ष किंमतीचे दोन आरो तयार झाले. मात्र मागील आठवड्यापासून महात्मा फुले वॉर्ड क्रमांक पाच मधील आरो पुर्णत: नादुरुस्त होता. तर ठाणा वॉर्ड क्रमांक चार मधील आरोमधील ए.टीएम. कार्ड मशिन काठून टाकलेली आहे.
परिणामी महिला शुध्द पाण्यासाठी परसोडी-जवाहरनगर तीन ते पाच किलोमीटर पार करीत शुध्द पाणी मिळण्यासाठी दैनिक पायपीट करीत होते. यामुळे नागरिकांना विशेष: महिलांना मानसीक व शारीरिक व आर्थिक त्रासाला बळी पडीत होते. याविषयी लोकमतने आपल्या दैनिकात ठाणा येथील आरोसंच नादुरुस्त या आशयाची बातमी प्रकाशीत करता. शासन प्रशासनाची हालचाली वेगाने सुरु झाले आणि महात्मा फुले वॉर्ड क्रमांक पाच मधील आरो सुरु झाले.

 

Web Title: The RO set started in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.