झुडपांमळे रस्ता धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 09:51 PM2017-10-29T21:51:43+5:302017-10-29T21:51:58+5:30
रस्त्याशेजारील परिसर स्वच्छ असावा असा नियम आहे. परंतु तामसवाडी सि. ते परसवाडा सि. दरम्यान रस्त्याशेजारी लहान मोठ्या झाडांची झुडपे तयार झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रस्त्याशेजारील परिसर स्वच्छ असावा असा नियम आहे. परंतु तामसवाडी सि. ते परसवाडा सि. दरम्यान रस्त्याशेजारी लहान मोठ्या झाडांची झुडपे तयार झाली आहेत. वर्दळीचा मार्ग असून अनेक ठिकाणी मार्ग वळणदार आहे. रस्त्याशेजारीत झुडूप येत्या चार दिवसात न काढल्यास आंदोलनाचा इशारा तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपूरे यांनी दिला आहे.
संबंधित विभागाला तामसवाडी सी ते परसवाडा सी रस्त्याशेजारी मोठी व लहान झाडे मोठ्या प्रमाणात वाढली, अशी माहिती दिली, परंतु केवळ वेळकाढू धोरण येथे दिसत आहे. लहान व मोठी वाहने या मार्गाने दररोज धावतात. झुडपामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. रस्ता वळणदार असल्याने रस्त्याशेजारील झुडूप काढणे आवश्यक आहे तसा नियम आहे, परंतु त्या नियमांना येथे बगल दिली जात आहे.
सध्या मंडईची रेलचेल गावा गावात सुरू आहे. रात्री या मार्गाने शेकडो जन जातात त्यांचया जीवाला धोका निर्माण झाला आहे. रस्ते सुरक्षित असावे.
रस्त्याशेजारील जागेची स्वच्छता करणे गरजेचे आहे. रस्त्याशेजारी मुरूम घालून त्याला समतोल करण्याची गरज आहे. येथे तोल जाऊन सरळ वाहनधारक झुडूपात जाण्याचीच भिती अधिक आहे. चार दिवसात सदर रस्ता झुडूपमुक्त न केल्यास नागरिकांसोबत आंदोलन करण्याचा इशारा गटनेते हिरालाल नागपुरे यांनी दिला आहे.