रस्ता चौपदरीकरणाचे काम बंद

By admin | Published: February 5, 2015 11:03 PM2015-02-05T23:03:18+5:302015-02-05T23:03:18+5:30

निलज-भंडारा राज्य मार्गावरील शहरातून जाणाऱ्या मार्गावरील उजवा कालवा ते नगर परिषद पाण्याच्या टाकीपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम थांबविण्यात आले आहे.

Road closure of four-lane | रस्ता चौपदरीकरणाचे काम बंद

रस्ता चौपदरीकरणाचे काम बंद

Next

पवनी : निलज-भंडारा राज्य मार्गावरील शहरातून जाणाऱ्या मार्गावरील उजवा कालवा ते नगर परिषद पाण्याच्या टाकीपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम थांबविण्यात आले आहे.
या रस्त्याचे चौपदरीकरणाच्या कामास दहा महिन्यापुर्वी सुरवात करण्यात आली. नालीचे काम पूर्ण झाले आहे. पण अजुनही बरेच काम झालेले नाही. या मार्गावरील उभे असलेले विद्युत खांब, डीपी हरलेल्या नाहीत. या सा.बां. वि. ने विद्युत वितरण महावितरण कंपनीमध्ये आवश्यक ती रक्कम भरलेली आहे. पण महावितरण कंपनीने अजुनपर्यंत विद्युत लाईन व डी.पी. हरविलेल्या नाहीत.रस्ता चौपदरीकरणाचे काम थांबविण्यात आलेले आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण अजुनही काढले नाहीत. त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामात अडथडे येत आहेत. या संदर्भात सदर प्रतिनिधींने सा. बा. वि. चे अभियंता शेगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्युत विभागाच्या विलंबनाच्यामुळे हे काम थांबल्याचे सांगितले. विद्युत खांब व डिपी हरल्यानंतर रस्ता कामासोबतच डांबरीकरणाचे काम सुरू केले जाईल. विद्युत विभाग यांनी सांगितले की, निविदाचे काम झाले असून जानेवारी १५ पर्यंत हे काम होईल. या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Road closure of four-lane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.