ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांचे धिंडवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 05:00 AM2021-08-28T05:00:00+5:302021-08-28T05:00:30+5:30

राष्ट्रीय महामार्गासह राज्य आणि जिल्हा मार्गही आहे. या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते; परंतु राज्य आणि जिल्हा मार्गांची अवस्था गत काही वर्षांपासून दयनीय झाली आहे. रेतीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांबाबत तर विचारायची सोय नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्यावरून ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत. बांधकाम विभाग रस्त्यांची डागडुजी करते.

Road congestion due to overloaded traffic | ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांचे धिंडवडे

ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांचे धिंडवडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दरवर्षी पावसाळा आला की, रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. ठिकठिकाणचे रस्ते उखडतात. रस्त्यावरून चालणे कठीण होते. पावसामुळे रस्ते खड्येमय झाल्याची बोंब ठोकली जाते. मात्र, रस्त्यांचे खरे धिंडवडे ओव्हरलोड वाहतुकीने त्यातही रेतीच्या वाहनांमुळे निघत आहेत. ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आरटीओची असली तरी खड्डेमय रस्त्यांच्या डागडुजीचा फटका सार्वजनिक बांधकाम विभागाला बसतो. भंडारा जिल्ह्यात रस्त्याचे जाळे सर्वदूर पसरले आहेत. 
राष्ट्रीय महामार्गासह राज्य आणि जिल्हा मार्गही आहे. या मार्गावरून अहोरात्र वाहतूक सुरू असते; परंतु राज्य आणि जिल्हा मार्गांची अवस्था गत काही वर्षांपासून दयनीय झाली आहे. रेतीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांबाबत तर विचारायची सोय नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्यावरून ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत. बांधकाम विभाग रस्त्यांची डागडुजी करते. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती ‘जैसे थे’ होते. पावसाळ्याच्या काळात तर हमखास रस्ते उखडतात. 
रस्ते उखडले की पावसाळ्याचे कारण पुढे करून त्यावर पांघरूण घातले जाते. मात्र, ओव्हरलोड वाहतुकीचा कुणीही उल्लेख करीत नाही. ३० ते ४० टन वजन घेऊन वाहने धावत असतात. यामुळे रस्ते पूर्णत: नादुरुस्त होत आहेत. 
ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी परिवहन विभागाची आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची आरटीओकडून नियमित तपासणी केली जाते; परंतु राज्य आणि जिल्हा मार्गावर धावणाऱ्या वाहनांची कधीच तपासणी होत नाही. आरटीओची जबाबदारी असली तरी रस्ता दुरुस्तीचा भुर्दंड मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला सहन करावा लागतो. नागरिकांच्या रोषाचाही सामना याच विभागाला करावा लागतो. 
भंडारा जिल्ह्यातून करचखेडा-करडी, विरली-लाखांदूर, तुमसर-रोहा, मोहाडी-रोहा, बपेरा-तुमसर, भंडारा-वरठी, तुमसर-गोंदिया यासह अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. रस्त्याच्या डागडुजीबाबत नागरिक नेहमी आक्रमक असतात; परंतु डागडुजी केल्यानंतरही रस्त्याची अवस्था कायम असते. 

तुमसर-मोहाडीत सर्वाधिक रस्ते नादुरुस्त
- भंडारा जिल्ह्यातील सर्वाधिक नादुरुस्त रस्ते तुमसर आणि मोहाडी तालुक्यात आहेत. या तालुक्यात असलेल्या रेतीघाटावर जाणारे रस्ते खाचखडग्यांनी भरलेले आहेत. गावातून जाणाऱ्या राज्य आणि जिल्हा मार्गांची अवस्थाही दयनीय आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचून वाहनांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यासोबतच अपघाताची मालिकाही कायम असते.

 

Web Title: Road congestion due to overloaded traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.