रस्ता बांधकामात अनियमितता

By admin | Published: March 20, 2016 12:44 AM2016-03-20T00:44:06+5:302016-03-20T00:44:06+5:30

मिटेवानी - हरदोली - टाकला ते उसर्रा रस्त्याचे डांबरीकरण सन २०१५ मध्ये करण्यात आले.

Road construction irregularities | रस्ता बांधकामात अनियमितता

रस्ता बांधकामात अनियमितता

Next

८० ऐवजी ४० मिमी बोल्डरचा वापर : जिल्हा परिषद सार्वजनिंक बांधकाम विभागाचा कारभार
तुमसर : मिटेवानी - हरदोली - टाकला ते उसर्रा रस्त्याचे डांबरीकरण सन २०१५ मध्ये करण्यात आले. या रस्त्याचे काम करारनाम्यानुसार झाले नाही. ८० एम.एम. बोल्डर ऐवजी ४० एम.एम. बोल्डर घालण्यात आले. एका वर्षातच डांबरीकरण उखडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या संपूर्ण रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. परंतु अद्याप चौकशी झाली नाही.
मिटेवानी - हरदोली - टाकला ते उसर्रा तीन कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण सन २०१५ मध्ये करण्यात आले. रस्त्याच्या करारनाम्यात ८० एम.एम. बोल्डर नमूद असून ४० एम.एम. चा बोल्डर वारण्यात आले आहे. खडीकरण व डांबरीकरण कामात तांत्रिकदृष्ट्या साहित्यावर १ लक्ष ७७ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे. सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण केवळ एका वर्षापूर्वी करण्यात आले. तरी निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून एका बाजूने रस्ता दाबला गेला आहे.
रस्त्याची जाडी अत्यंत अल्प असून साईड बुमची कामे अद्याप अपूर्ण आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी क्रास चेकिंग खोटी दाखवून शासनाच्या लाखो रूपयांची अफरातफर केली आहे.
रस्त्याचे नाव मिटेवानी - हरदोली, टाकला, उसर्रा एवढे लांबलचक करण्यात येऊन मिटेवानी ग्रामपंचायत येथे एजन्सी दाखविण्यात आली आहे. वास्तविक ही एजन्सी हरदोली, टाकला, उसर्रा असायला पाहिजे होती, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता तक्रारकर्ता रविदयाल पटले यांनी वर्तविली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Road construction irregularities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.