शहरातील अंतर्गत रस्त्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 10:21 PM2019-09-02T22:21:56+5:302019-09-02T22:22:17+5:30
पावसाळाच्या तोंडावर नेक शहरातील रस्त्यांनी कात टाकली असून वाहनधारकांना अडसर ठरत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च होत असतांना चांगल्या रस्त्याची कामे होत नसल्याने शहरवासीयांना त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. नेहमीच येतो पावसाळा अशी अवस्था या रस्त्यांची झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील मुख्य वर्दळीचे तसेच अंतर्गत भागातील विविध रस्ते खड्डेमय झाल्याने शहरवासीयांना रस्त्यावर प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. दरवर्षीच रस्त्याची डागडुजी केली जाते. परंतू पावसाळाच्या तोंडावर नेक शहरातील रस्त्यांनी कात टाकली असून वाहनधारकांना अडसर ठरत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च होत असतांना चांगल्या रस्त्याची कामे होत नसल्याने शहरवासीयांना त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. नेहमीच येतो पावसाळा अशी अवस्था या रस्त्यांची झाली आहे.
शहरातील मुस्लीम लायब्ररी चौक, खात रोड, वरठी रोड यासह इतर अंतर्गत भगातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
त्यामुळे पाऊसाचे प्रमाणात पाणी खड्ड्यात साचत असल्याने पायी चालणाऱ्या नागरिकाच्या अंगावर चिखलयुक्त पाणी उडले जाते. प्रसंगी शाळकरी विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांना याचा दररोज मनस्ताप सोसावा लागत आहे.
यासाठी शहरातील लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देण्याची मागणी होत आहे. जिल्हा परीषद चौकातील गणेशपूर रस्त्यावर खड्डे झाल्याने गणेशपूरवासीही त्रस्त आहेत.
एकीकडे गावात लाखो रुपयांचा खर्च होतो तर दुसरीकडे दरवर्षीच रस्त्याची दुरावस्था पहायला मिळते. रस्त्यावरून वाहने चालवितांना वाहनधारकांना कमालीची कसरत करावी लागते तसेच संध्याकाळच्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीधारक घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतू याकडे प्रशासनाचे जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करित आहेत.