रस्ता नाली खोदकामात वृक्षांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:09 AM2017-12-13T00:09:36+5:302017-12-13T00:10:01+5:30

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सौदेपूर - खैरटोला क्रमांक ३५९ रस्ता बांधकाम दरम्यान वन विभागाच्या सीमेतून रस्त्याची नाली खोदकाम केली.

Road drain damaged trees | रस्ता नाली खोदकामात वृक्षांचे नुकसान

रस्ता नाली खोदकामात वृक्षांचे नुकसान

Next
ठळक मुद्देसौदेपूर-खैरटोला मार्ग : सध्या काम बंद, मुख्यमंत्री सडक योजनेचा रस्ता, वनविभाग मागणार माहिती

मोहन भोयर।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सौदेपूर - खैरटोला क्रमांक ३५९ रस्ता बांधकाम दरम्यान वन विभागाच्या सीमेतून रस्त्याची नाली खोदकाम केली. त्या अनुषंगाने वन विभागाच्या अधिकाºयांनी चौकशी करून माहिती मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना मागितली आहे.
सध्या रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले आहे. रस्त्याची नाली तयार करताना काही वृक्षांच्या मुळांना येथे धोका पोहचविण्यात आला आहे. नाली खोदकाम करताना खूप खोल केली. त्यामुळे वन्यप्राण्यांचा जीव येथे धोक्यात आला आहे.
राज्यमार्ग ३५६ सौदेपूर खैरटोला या रस्त्याच्या बांधकामादरम्यान काही ठिकाणी नाली बांधकाम करताना वन विभागाच्या सीमेतून ती करण्यात आली. हा रस्ता घनदाट जंगलातून जातो. तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत हे जंगल येते. रस्त्याची अंदाजपत्रकीय किंमत दोन कोटी ४९ लक्ष ५० हजार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत या रस्त्याची देखरेख व नियंत्रण केले जात आहे. दरम्यान तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी यांनी मौका चौकशी केली. त्या अनुषंगाने संबंधित कार्यालयाकडे माहितीची विचारणा केली. संबंधित विभागाचे पत्र वन विभागाला प्राप्त झाले. त्यात नियमानुसार अटी व शर्तीची माहिती दिली आहे. असे वनपरिक्षेत्र अधिकारी जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पर्यावरण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर डांबरीकरण करण्याची परवानगी वनविभाग येथे देणार असल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी जोशी यांनी सांगितले.
खोदकामाने वृक्षांची मुळे पडली उघडी
सौदेपूर खैरटोला रस्ता घनदाट जंगलव्याप्त परिसरातून जातो. रस्ता बांधकाम करताना अंदाजपत्रकीय नियमानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता लहान नालीचे बांधकाम करण्यात आले. नाली खोदकाम करताना ती खूप खोल करण्यात आली. नाली खोदकाम दरम्यान काठावरील वृक्षांना धोका पोहचविण्यात आला आहे. काही ठिकाणी वृक्षांची मुळे उघड झाली आहेत.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली बांधकामाचे आकारमान काय? याची माहिती संबंधित विभागाला मागितली आहे. झाडांचे नुकसान झाले काय त्याचा संपूर्ण अहवाल वन कर्मचाऱ्यांकडून मागून घेणार आहे. नियमबाह्य कामे केली असतील तर नियमानुसार कारवाई केली जाईल.
-अरविंद जोशी, वनपरिक्षेत्र अधिकारी, तुमसर.

Web Title: Road drain damaged trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.