खराशी पुलालगतचा रस्ता बनला खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:41 AM2021-09-14T04:41:39+5:302021-09-14T04:41:39+5:30

प्रवास धोक्याचा : बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी मुखरू बागडे पालांदूर : पालांदूर ते खराशी या राज्यमार्गावर असलेला महत्त्वाकांक्षी ...

The road near Kharashi bridge became rough | खराशी पुलालगतचा रस्ता बनला खडतर

खराशी पुलालगतचा रस्ता बनला खडतर

Next

प्रवास धोक्याचा : बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी

मुखरू बागडे

पालांदूर : पालांदूर ते खराशी या राज्यमार्गावर असलेला महत्त्वाकांक्षी पूल मजबूत झाला. परंतु पुलाच्या दोन्ही रस्त्यांच्या बाजू खचल्याने वाहतूक व्यवस्था धोक्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहने त्या रस्त्यावर उसळतात. तेव्हा बांधकाम विभागाने तत्परता बाळगत किमान पुलाच्या शेजारील खाचखड्डे भरणे आवश्यक झाले आहे.

अड्याळ ते दिघोरी मार्गावर पालांदूरच्या पुढे खराशी नाल्यावर दोन वर्षांपूर्वी महत्त्वाकांक्षी मोठा पायलट पूल तयार करण्यात आला. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसातील रहदारी सुरळीत सुरू आहे. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूंचा रस्ता खड्ड्यांच्या आश्रयित झालेला आहे. त्याचप्रमाणे अगदी पुलाच्या जवळील रस्त्याचे बांधकाम खाली गेल्याने खाच पडलेली आहे. त्यामुळे सर्वसाधारण गतीने धावणारी वाहने नियंत्रणमुक्त होतात. दुचाकीवरील पाठीमागे बसणारी व्यक्ती चेंडूप्रमाणे उसळते.

पर्यायाने अपघात होतात. गत वर्षभरापूर्वी अशाच खाचखड्ड्याने याच पुलाच्या शेजारी दुचाकीच्या अपघातात महिलेला जीव गमवावा लागला होता. पती दुचाकी चालवत होता तर पत्नी मागे बसली होती. रस्त्यावरील खाच नजरेत भरणारी नसल्याने वाहनाचा वेग कायम होता. त्यामुळे दुचाकीवरील मागची स्वार रस्त्यावर पडून गंभीर जखमी होत उपचारादरम्यान मृत्युमुखी पडली होती.

कोट बॉक्स

खराशी पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्ता संपूर्ण फुटलेला आहे. पुलाच्या जवळ रस्त्याला खाचसुद्धा आहे. नियमित किरकोळ अपघात घडत आहेत. आम्हांला दररोजच याच रस्त्याने प्रवास करावा लागतो. तेव्हा आणखी कोणाचे प्राण जाण्यापूर्वी रस्ता व खाच सुरळीत व्हावा. बांधकाम विभागाने शक्य तितक्या लवकर रस्ता मजबूत करून द्यावा.

योगेश झलके, सामाजिक कार्यकर्ता, खराशी.

खराशी पुलाजवळील रस्ताच्या खड्ड्यांच्या व खाचेच्या अनुषंगाने तत्परता बाळगत भराव भरला जाईल. पाऊस थांबताच खड्ड्यांचे बांधकाम हाती घेण्यात येईल.

दीनदयाल मटाले, उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग, लाखांदूर.

Web Title: The road near Kharashi bridge became rough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.